एटीएममधून पैसे लंपास करणारे तिघेजण पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2019 10:41 AM2019-07-12T10:41:48+5:302019-07-12T10:44:16+5:30

स्टेट बँक आॅफ इंडियाच्या नगर शहरातील मुख्य शाखेजवळ असलेल्या एटीएममध्ये चोरट्यांनी तांत्रिक बिघाड करून तब्बल १८ लाख ९२ हजार ५०० रुपये लंपास केले होते.

Three people caught snapping money from the ATM | एटीएममधून पैसे लंपास करणारे तिघेजण पकडले

एटीएममधून पैसे लंपास करणारे तिघेजण पकडले

अहमदनगर : स्टेट बँक आॅफ इंडियाच्या नगर शहरातील मुख्य शाखेजवळ असलेल्या एटीएममध्ये चोरट्यांनी तांत्रिक बिघाड करून तब्बल १८ लाख ९२ हजार ५०० रुपये लंपास केले होते. याबाबत आठवडाभरापूर्वी बँकेकडून फिर्याद दाखल झाली होती. पोलिसांनी गतीने चक्रे फिरवून याप्रकरणी तिघांना ताब्यात घेतले आहे. यात एका महिलेचाही समावेश आहे.
स्टेट बँक आॅफ इंडियाच्या नगर शहरातील मुख्य शाखेजवळ असलेल्या एटीएममध्ये चोरट्यांनी तांत्रिक बिघाड करून तब्बल १८ लाख ९२ हजार ५०० रुपये लंपास केले होते. ५ एप्रिल ते २२ मे च्या दरम्यान ही घटना घडली होती. याप्रकरणी बँकेचे सहायक महाप्रबंधक मेघाशाम मारोतराव ईजेवार यांनी मंगळवारी (दि़२) भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. एटीएममध्ये पैसे चोरणाऱ्या चोरट्यांनी बँकेच्या आॅनलाईन तक्रार वेबसाईटवर जाऊन पैसे न मिळाल्याबाबत तक्रार करून नुकसान भरपाईचीही मागणी केली होती़ पैसे गेल्यानंतर बँक अधिकाऱ्यांच्या ही चोरी निदर्शनास आली़
याबाबत भिंगार पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शंकरसिंह राजपूत यांनी तपासाची चक्रे फिरवून आठवडाभरात आरोपींच्या मुसक्या आवळल्या. या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार विरेंद्र आयोध्याप्रसाद यादव (वय २७, उत्तरप्रदेश), पवन पुंडलिकराव जिवरख (वय २३, औरंगाबाद) व श्वेता कमलेश सिंग (वय २५, कांदिवली, मुंबई) या तिघांना अटक केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून न्यायालयाने त्यांना १५ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या आरोपींसोबत आणखी उत्तरप्रदेश येथील साथीदार असल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.

Web Title: Three people caught snapping money from the ATM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.