शहरात सकाळी ९ ते दुपारी १२ व संध्याकाळी ४ ते ७ पर्यंत प्रत्येक रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते. बहुतांशी वेळा वाहतूक पोलीस उपलब्ध नसल्यामुळे घाईगर्दी मध्ये पुढे जाण्याच्या नादात रहदारी ठप्प होते. तासनतास नागरिकांना वाहतूक कोंडीत अडकून मोठ्या यातना सहन कराव्या लागतात. शहरातील रस्ते अरुंद असल्याने दररोज वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत आहे.
प्रत्येक शहरामध्ये रहदारीची अनागोंदी सुरू आहे. त्यामुळे संघटनेने पुढाकार घेऊन अहमदनगरसह प्रत्येक शहरात सामाजिक कार्यकर्ते यांच्या सहभागातून लोकहित रहदारी नियंत्रण समिती उभे करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारपुढे संघटनेच्या वतीने ठेवण्यात आला आहे. या समितीच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते, युवक व विशेषतः महिला होमगार्ड पथकांना अशा प्रकारच्या रहदारी नियंत्रणाचे काम देण्याची मागणी करण्यात आली आहे.