लोणीमावळ्यात बिबट्याने पाडला दोन शेळ्यांचा फडशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2019 01:37 PM2019-09-08T13:37:11+5:302019-09-08T13:37:11+5:30
पारनेर तालुक्यातील लोणीमावळा येथे भाऊसाहेब ममता नाईकवाडी यांच्या घराजवळील गोठ्यातील शेळ्यांवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार झाल्या तर एक शेळी जखमी झाली आहे.
लोणीमावळा : पारनेर तालुक्यातील लोणीमावळा येथे भाऊसाहेब ममता नाईकवाडी यांच्या घराजवळील गोठ्यातील शेळ्यांवर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार झाल्या तर एक शेळी जखमी झाली आहे.
नाईकवाडी यांच्या डाळिंबाच्या शेताजवळ रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास बिबट्या दबा धरुन बसलेला होता. घरातील मंडळी घराजवळ असणाºया शेतामध्ये शेतीची कामे करीत होती. घराजवळ माणसांचा वावर नसल्याने दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक शेळयांवर हल्ला केला. यात बिबट्याने दोन शेळ्यांचा फडशा पाडला. तर एक शेळी ओढून घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत होता. शेळीचा आवाज आल्यावर जवळच काम करीत असणाºया लोकांच्या लक्षात आले. त्यांनी घराकडे धाव घेतली. यावेळी बिबट्याने धूम ठोकली.
घडलेल्या घटनेची माहिती वनविभागाला कळतात वनविभागाच्या अधिकाºयांनी घटनास्थळी भेट दिली. या घटनेने परिसरात घबराटीचे वातावरण आहे. तातडीने पिंजरा लावण्याची मागणी डॉ.सुभाष मावळे, संदीप हाडवळे, विकास लामखडे, संजय मावळे, सार्थक मावळे, दत्तात्रय लामखडे, बाबाजी नाईकवाडी, शिवाजी नाईकवाडी यांनी वनविभागाकडे केली आहे.