तळेगाव दिघे विद्यालयात प्राचार्य एच. आर. दिघे, पर्यवेक्षक संजय दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनींनी रविवारी सकाळी वृक्षांना राख्या बांधून अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे केले. १२ वीच्या विद्यार्थिंनींनी विद्यालय परिसरातील विविध वृक्षांना राख्या बांधल्या. पर्यावरण सुरक्षेसाठी वृक्षांचे अनन्य साधारण महत्त्व लक्षात घेता विद्यालय परिसरातील वृक्षांना राख्या बांधून रक्षाबंधन करण्यात आले. प्रसंगी प्राचार्य एच. आर. दिघे, पर्यवेक्षक संजय दिघे, ज्येष्ठ शिक्षक शिवाजी दिघे, बी. सी. दिघे, पुंजाहरी दिघे, तुकाराम सोळसे, प्रभाकर जोरी, बाबासाहेब गागरे, प्रताप जोंधळे, राम गायकवाड, अविनाश बिऱ्हाडे, मच्छिंद्र सोळसे, संभाजी सुर्वे, अश्विनी बिऱ्हाडे, शोभा गुंजाळ, शीतल कडलग, आशा पन्हाळकर उपस्थित होते. पूजा बोडखे यान विद्यार्थिंनीने रक्षाबंधनाच्या निमित्ताने वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला. तळेगाव दिघे विद्यालयात विद्यार्थिनींनी वृक्षांना राख्या बांधत अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे करण्यात आले.
तळेगाव विद्यालयात वृक्षांना राख्या बांधून अनोखे रक्षाबंधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 4:23 AM