नियोजनशून्य कारभार, सामान्यांची ससेहोलपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:16 AM2021-06-01T04:16:29+5:302021-06-01T04:16:29+5:30

अहमदनगर : कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी सर्वसामान्यांची ससेहोलपट सुरू असतानाच महापालिका खिरापत वाटल्याप्रमाणे दररोज नव्या केंद्रांचे वाटप करत ...

Unplanned management, sassholpat of commoners | नियोजनशून्य कारभार, सामान्यांची ससेहोलपट

नियोजनशून्य कारभार, सामान्यांची ससेहोलपट

अहमदनगर : कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी सर्वसामान्यांची ससेहोलपट सुरू असतानाच महापालिका खिरापत वाटल्याप्रमाणे दररोज नव्या केंद्रांचे वाटप करत आहे. यावर कळस असा की भाजपने रविवारी लसीकरण करून घेतल्याने सोमवारी एकाही लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध नव्हती. त्यामुळे रांगा लावूनही अनेकांना लस मिळालीच नाही.

शहरातील लसीकरण मोहिमेचा पूर्णपणे फज्जा उडाला आहे. त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सोसावा लागत आहे. सामान्य नागरिक या केंद्रावरून त्या केंद्रावर लस घेण्यासाठी अक्षरश: चकरा मारताना दिसत आहेत. त्यांना लस शिल्लक नाही. उपकेंद्राला पाठविली आहे, असे सांगून बाहेरचा रस्ता दाखविला जात आहे. तिथेही लस उपलब्ध नसते. महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे सामान्यांना अक्षरश: कसरत करावी लागत आहे. असे असताना नगरसेवक केंद्र वाढविण्याचा आग्रह प्रशासनाकडे धरत आहेत. त्याला एकप्रकारे प्रशासनही जबाबदार आहे. कारण काही भागात ५०० मीटरवर तर काही भागात दूरदूरपर्यंत केंद्र नाहीत. एकाच भागात तीन ते चार केंद्र कुणाच्या सांगण्यावरून दिले गेले, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. लसीकरणाचे उपकेंद्र सुरू करताना नेमका कोणता निकष लावला जातो, हे गुलदस्त्यात आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रात वाढ होऊन लस अपुरी पडू पडत आहे. परिणामी काही केंद्रांवर १० ते २० या प्रमाणात लस दिली जात असल्याने महापालिकेचे हसे झाले आहे.

......

तुम्ही विकत द्या, आम्ही मोफत देतो

राष्ट्रवादी आणि भाजप नगरसेवकांच्याच प्रभागात लसीकरण केंद्र सुरू केल्याचा आरोप करत शिवसेनेच्या पदाधिकारी नगरसेवकांनी सोमवारी मनपा आयुक्त शंकर गोरे यांना घेराव घातला. यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान संतप्त नगरसेवकांनी तुम्ही विकत लस द्या, आम्ही ती नागरिकांना मोफत देतो, असे सांगितले.

...

आरोग्य समिती हतबल

कोरोनावरील उपाययोजना व लसीकरणाच्या नियोजनासाठी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी आरोग्य समिती स्थापन केली. या समितीने प्रत्येक प्रभागात एक केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यानुसार आयुक्तांनी २० नवीन केंद्र सुरूही केले. परंतु, काही नगरसेवकांनी आमच्या भागात केंद्र सुरू का केले नाही, असा प्रश्न उपस्थित करत प्रशासनाला धारेवर धरले. यावर कळस असा की एका लसीकरण केंद्रावर लस कुणाला द्यायची, यावरून नगरसेवकांतच जुंपली.

Web Title: Unplanned management, sassholpat of commoners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.