विनापरवाना दारूवर छापा : १६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 05:21 PM2018-12-06T17:21:35+5:302018-12-06T17:21:39+5:30
महापालिका निवडणुकीच्या पाश्वभुमीवर विनापरवाना दारूची वाहतूक करताना राज्य उत्पादन शुक्ल विभागाने कारवाई केली. यामध्ये तब्बल १६ लाख ७५ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
अहमदनगर : महापालिका निवडणुकीच्या पाश्वभुमीवर विनापरवाना दारूची वाहतूक करताना राज्य उत्पादन शुक्ल विभागाने कारवाई केली. यामध्ये तब्बल १६ लाख ७५ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पारनेर तालुक्यातील पुणेवाडी शिवारात, नगर तालुक्यातील कामरगाव शिवार, बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील कारखेल शिवार अशा तीन ठिकाणी सापळे रचून कारवाई केली. दारुची वाहतूक करणा-या वाहनांचा पाठलाग करत छापा टाकला. या कारवाईमध्ये भागचंद कोडिंबा सोनवणे, मेघराज रामचंद्र बानिया, भीमराव उत्तम घुले यांना अटक केली. तसेच त्यांच्याकडून विदेशी दारुच्या १ हजार ११९ बाटल्या जप्त केल्या. तसेच तीन चारचाकी वाहनेही जप्त केली. एकूण ७५ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
निरीक्षक संजय सराफ, ए.बी.बनकर, दुय्यम निरीक्षक डी.सी.आवारे, जी.आर.चांदेकर, एस.एस. भोसले, दीपक बर्डे, निलेश शिंदे, नंदकुमार ठोकळ, स्विटी राठोड, दीपाली शिंदे, वसंत पालवे, योगेश मडके, प्रविण साळवे यांच्या पथकाने कारवाई केली.