जिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटरचा वापर वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 04:19 AM2021-04-06T04:19:07+5:302021-04-06T04:19:07+5:30
अहमदनगर : ग्रामीण भागातील सरकारी रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटरची उपलब्धता आहे. कोरोनामुळे व्हेंटिलेटरवरील धूळ झटकली गेली आहे. ग्रामीण भागातील सरकारी रुग्णालयात ...
अहमदनगर : ग्रामीण भागातील सरकारी रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटरची उपलब्धता आहे. कोरोनामुळे व्हेंटिलेटरवरील धूळ झटकली गेली आहे. ग्रामीण भागातील सरकारी रुग्णालयात सध्या सरासरी ५ ते १० व्हेंटिलेटर उपलब्ध असून ते सर्व कार्यान्वित करण्यात आले आहेत. जिल्हा रुग्णालयात ५९ व्हेंटिलेटर असून, ते सर्वच्या सर्व रुग्णांना उपचारासाठी वापरण्यात येत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसात जिल्हा रुग्णालयातही व्हेंटिलेटरची कमतरता जाणवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नगर जिल्ह्यात कोरोनाच्या गंभीर रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा स्थितीत शहरी भागात व्हेंटिलेटर कमी पडत आहेत. ग्रामीण भागातील व्हेंटिलेटर्सही कार्यान्वित करण्यात आली आहेत. यापूर्वी तेथील व्हेंटिलेटर्स पडून होते. त्यावरील धूळ आता झटकली आहे. जिल्ह्यातील सर्वच्या सर्व व्हेंटिलेटर उपयोगात असल्याचे तेथील डॉक्टरांनी ‘लोकमत’ला सांगितले.
---
जिल्हा रुग्णालयातील स्थिती
बेडची क्षमता-२७२
सध्या उपचार घेणारे रुग्ण -४८३
गंभीर रुग्ण -५९
उपलब्ध व्हेंटिलेटर-५९
------------
व्हेंटिलेटर देता का व्हेंटिलेटर?
जिल्हा रुग्णालयातील सर्व बेड सध्या हाऊसफुल्ल झाले आहेत. जिल्हा रुग्णालयात २७२ इतकीच बेडची क्षमता आहे. मात्र, कोरोना नसलेल्या रुग्णांचे उपचार आता बंद करण्यात आले आहेत. तेथील बेड कोरोनासाठी उपयोगात आणले जात आहेत. जिल्हा रुग्णालयात क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण दाखल होत आहेत. जिल्हा रुग्णालयात सोमवारी दुपारी तब्बल ४८३ कोरोनाचे रुग्ण उपचार घेत होते. दुसरीकडे रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे व्हेंटिलेटर देता का कोणी व्हेंटिलेटर ? अशीच स्थिती ओढवण्याची शक्यता सुत्रांनी व्यक्त केली.
---------------
तालुक्यात व्हेंटिलेटर रुग्णांसाठी उपयोगात
कोपरगावसारख्या तालुक्यात रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, तेथील ग्रामीण रुग्णालयात केवळ दोनच व्हेंटिलेटर असून, ते वापरात आहेत. कर्जतसारख्या ठिकाणीही रुग्ण संख्या सरासरी ८० ते १०० च्या आसपास रोज आढळून येत आहे. तेथील ग्रामीण रुग्णालयात १० व्हेंटिलेटर कार्यान्वित आहेत.
----------
सध्या जिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटर पुरेसे आहेत. एकूण ६३ व्हेंटिलेटर कार्यान्वित आहेत. नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी. मास्क, सामाजिक अंतर व सॉनिटायझर या नियमांचे पालन करावे. शक्यतो कामाशिवाय घराबाहेर पडू नये. कोरोनाची स्थिती गंभीर असून, आगामी काळात व्हेंटिलेटरची गरज वाढू शकते. रुग्णांना व्हेंटिलेटर कमी पडणार नाहीत, याची सर्व दक्षता प्रशासनाने घेतली आहे.
- डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा शल्य चिकित्सक
----------
डमी
नेट फोटो------
०२ व्हेंटिलेटर ईन रुरल डमी
व्हेंटिलेटर
पेशंट
व्हेंटे