श्रीरामपुरात लसीकरणाचा उडाला फज्जा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2021 04:15 AM2021-04-29T04:15:45+5:302021-04-29T04:15:45+5:30
गेल्या दोन दिवसांपासून येथे लसीचे १२० ते १५० डोस आलेले आहेत. आठवडाभरात काही दिवस केंद्र बंद ठेवण्याची नामुष्की ओढवली ...
गेल्या दोन दिवसांपासून येथे लसीचे १२० ते १५० डोस आलेले आहेत. आठवडाभरात काही दिवस केंद्र बंद ठेवण्याची नामुष्की ओढवली आहे.
जिल्हा स्तरावरून लसींचा पुरवठा करताना येथे कोणतीही पूर्वसूचना दिली जात नाही. प्रशासन व रुग्णालयामध्ये समन्वयाचा अभाव आहे. नागरिकांना ऐन वेळी रांगेत उभे राहिल्यानंतर डोस संपल्याची माहिती दिली जाते. त्यामुळे ज्येष्ठ व अपंग नागरिकांचे मोठे हाल होत आहेत.
एकीकडे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद आहे. त्यामुळे शहरातून लसीकरणासाठी रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांकडून रिक्षाचालक दोनशे रुपयांची आकारणी करतात. त्यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो, असे चित्र आहे.
-------
रुग्णालयाकडून सेवा
रुग्णालयातील लसीकरणाचे काम करणाऱ्या प्रसन्न धुमाळ, श्रीकांत थोरात, संजय दुशिंग व राकेश गायकवाड या कर्मचाऱ्यांनी स्वत: एक हेल्पलाइन सुरू केली आहे. त्यावर नागरिकांना लसीकरणाच्या वेळेबाबत ते माहिती देत आहेत. त्यांना दररोज पाचशे फोन कॉल्स स्वीकारावे लागत आहेत; मात्र तरीही ते सेवा बजावत आहेत.
------------
फोटो ओळी : लसीकरण
येथील ग्रामीण रुग्णालयात लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांची लांबच लांब रांग.
---------