शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
2
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
3
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: नांदेड पोटनिवडणुकीत अखेर काँग्रेसचा विजय; रविंद्र चव्हाण यांचा १४५७ मतांनी विजय
4
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
5
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
6
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
7
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
8
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
9
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
10
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
11
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
12
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
13
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
14
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
15
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचे आमदार
18
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
19
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय

शिंदेंचा शिलेदार ठरला संगमनेरमध्ये जायंट किलर; थोरातांना पराभूत करणारे अमोल खताळ कोण आहेत?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 6:12 PM

Assembly Election 2024 Result Live Updates : संगमनेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला सर्वात मोठा धक्का बसला आहे. या ठिकाणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला आहे.

Assembly Election 2024 Result Live Updates : राज्यात २८८ विधानसभा निवडणुकांसाठी झालेल्या निवडणुकीत महायुतीची त्सुनामी पाहायला मिळाली. या त्सुनामीत महाविकास आघाडीचा सुफडा साफ झाला आहे. आघाडीच्या एकाही पक्षाला किमान विरोधी पक्षनेतेपद मिळेल इतक्याही जागा मिळाल्या नाहीत. यामध्ये अनेक दिग्गज लोकांचा पराभव झाला आहे. काँग्रेसमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकरे यांच्यासह सलग आठवेळा निवडून येणारे बाळासाहेब थोरात यांनाही पराभवाचा धक्का बसला आहे. शिंदे गटाचे तरुण नेते अमोळ खताळ हे संगमनेरमध्ये जायंट किलर ठरले आहेत.

बाळासाहेब थोरात यांचा पराभव करणारे अमोल खताळ कोण आहेत?लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार सुजय विखे पाटील यांचा पराभव राधाकृष्ण विखे पाटील यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता. थोरात आणि विखे पाटील यांच्यात नगर जिल्ह्यातील वर्चस्वावरुन कायमच संघर्ष पाहायला मिळाला आहे. त्यामुळेच विखेंच्या पराभवानंतर थोरातांना विधानसभेत धक्का देण्याचा चंगच विखे कुटुंबाने बांधला होता. यावेळेस संगमनेर विधानसभा निवडणूक ही विखे पिता पुत्रांनी अतिशय प्रतिष्ठेची केली होती. शिंदे गटाने यावेळी तरुण उमेदवार अमोल खताळ यांना तिकीट दिले.

अमोल खताळ यांना विखे पिता पुत्रांचा फक्त पाठिंबाच नव्हता तर संपूर्ण निवडणुकीत रसद पुरवण्याचेही काम त्यांनी केले. या निवडणूक प्रचारादरम्यान अमोल खताळ हेच माझ्यासाठी सुजय विखे आहेत व त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आपली आहे, असे वक्तव्य मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केल्याने निवडणुकीमध्ये रंगत आली होती.

अमोल खताळ हे मूळ भाजपचे मतदारसंघ प्रमुख होते. गेल्या चार-पाच वर्षांपासून त्यांनी या मतदारसंघात चांगलेच पाय रोवले होते. अमोल खताळ यांनी सर्वसामान्य जनतेचे अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तालुक्यात त्यांची चांगलीच ओळख निर्माण झाली होती. आजपर्यंत बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात तुल्यबळ उमेदवार नसल्याने एकतर्फी विजय मिळत होता. परंतु, अमोल खताळ यांनी या निवडणुकीत थोरात यांना तगडी टक्कर दिली व विजयश्री खेचून आणला.

बाळासाहेब थोरातांविषयी नाराजी?विद्यमान आमदार बाळासाहेब थोरात हे अनेक वर्ष महसूल मंत्री होते. परंतु, तालुक्यात औद्योगिक वसाहत तयार करण्यात त्यांना अपयश आलं होतं. हाच मुद्दा अमोल खताळ यांनी प्रचारात उचलून धरला. या निवडणुकीत प्रचारादरम्यान संगमनेर मधील युवकांच्या रोजगाराकरिता औद्योगिक वसाहत निर्माण करण्याचे आश्वासन अमोल खताळ भाषणांमधून देत होते. तसेच बाळासाहेब थोरात या मतदारसंघाचे आमदार असताना देखील महायुतीने २ वर्षांमध्ये सहाशे कोटींचा निधी या ठिकाणी दिला होता.

लाडकी बहीण योजनेला देखील या तालुक्यातून प्रचंड प्रतिसाद मिळाला असल्याने याचा देखील फायदा अमोल खताळ यांना झाला. तसेच थोरात यांनी गौण खनिज माफीया या तालुक्यात तयार केल्याचा आरोप देखील चांगला चर्चेत होता. या प्रकारचे अनेक मुद्दे खताळ यांच्या प्रचारात सकारात्मक वातावरण तयार करत गेले व त्यांना आज विजय मिळाला. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील