विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा बिगुल वाजला : मतदार यादी कार्यक्रम जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 11:24 AM2019-07-13T11:24:35+5:302019-07-13T11:28:05+5:30

येत्या महिनाभरात मतदार यादी अपडेट करून अंतिम यादी १९ आॅगस्टला प्रसिद्ध करायची आहे.

Vidhan Sabha election preparations prepares: Voters list announced in the program | विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा बिगुल वाजला : मतदार यादी कार्यक्रम जाहीर

विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा बिगुल वाजला : मतदार यादी कार्यक्रम जाहीर

ठळक मुद्देप्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी - १५ जुलै २०१९मतदार नोंदणी विशेष मोहिम - २०, २१, २७, २८ जुलैअंतिम मतदार यादी प्रसिद्धी -१९ आॅगस्ट २०१९

अहमदनगर : राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचा बिगुल वाजला असून त्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम शुक्रवारी जाहीर केला. त्यानुसार येत्या महिनाभरात मतदार यादी अपडेट करून अंतिम यादी १९ आॅगस्टला प्रसिद्ध करायची आहे.
यासंदर्भात भारत निवडणूक आयोगाने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्राद्वारे कळवले असून मुख्य निवडणूक अधिका-यांनी सर्व जिल्हाधिका-यांना या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
या कार्यक्रमांतर्गत १ जानेवारी २०१९ रोजी ज्या मतदारांचे वय अठरा वर्षे पूर्ण आहे, परंतु त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट नाहीत, अशा मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ट करणे, मतदार यादीतील मयत, दुबार आणि स्थलांतरित मतदारांच्या नावांची वगळणी करून निर्दोष अंतिम मतदार यादी जाहीर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.
सोमवारी (दि. १५) या कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी करावयाची असून त्यावर दावे, हरकती स्वीकारायच्या आहेत. महिनाभरात चार दिवस विशेष मतदार नोंदणी अभियान राबवले जाणार आहे. त्यानंतर दाखल दावे, हरकती निकाली काढून उपजिल्हा निवडणूक अधिकारी किंवा यादी निरीक्षकांकडून मतदार यादीची विशेष तपासणी होईल. त्यानंतर १९ आॅगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल़ ही यादी विधानसभा निवडणुकीसाठी अंतिम ठरविली जाणार आहे.

मतदार यादी कार्यक्रम
प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी - १५ जुलै २०१९
यादीवर दावे, हरकती स्वीकारणे - १५ ते ३० जुलै
मतदार नोंदणी विशेष मोहिम - २०, २१, २७, २८ जुलै
दावे व हरकती निकाली काढणे - ५ आॅगस्टपर्यंत
अधिकाºयांकडून तपासणी - १३ आॅगस्टपर्यंत
पुरवणी यादी छपाई -१६ आॅगस्टपर्यंत
अंतिम मतदार यादी प्रसिद्धी -१९ आॅगस्ट
 

Web Title: Vidhan Sabha election preparations prepares: Voters list announced in the program

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.