कान्हूर पठार येथे बाकडे भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:19 AM2020-12-29T04:19:32+5:302020-12-29T04:19:32+5:30

कान्हूर पठार : अभ्युदय बँकेचे संचालक मोहन घनदाट यांच्या वतीने कान्हूर पठार (ता. पारनेर) येथे चाळीस हजार रुपयांचे बाकडे ...

Visit to Bakde at Kanhur Plateau | कान्हूर पठार येथे बाकडे भेट

कान्हूर पठार येथे बाकडे भेट

कान्हूर पठार : अभ्युदय बँकेचे संचालक मोहन घनदाट यांच्या वतीने कान्हूर पठार (ता. पारनेर) येथे चाळीस हजार रुपयांचे बाकडे भेट देण्यात आले.

कान्हूर पठार येथे तरुणाईच्या संकल्पनेतून साकार झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज जॉगिंग ट्रॅकवर हे बाकडे बसविण्यात आले आहेत. या आकर्षक बाकड्यामुळे ट्रॅकच्या सौंदर्यात अधिकच भर पडली आहे. त्याचप्रमाणे गावातील चौकात, विठ्ठल-रुक्मिणी मंदिरापुढे, स्मशानभूमी शेजारी हे बाकडे बसविण्यात आले आहेत. ज्यावेळेस जॉगिंग ट्रॅकचे काम चालू होते. त्यावेळी मोहन घनदाट यांनी ट्रॅकवर बाकडे देण्याचे कबूल केले होते. त्यांनी दिलेला शब्द पाळल्यामुळे चंद्रभान ठुबे मित्रमंडळाच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी सैनिक बँकेचे अध्यक्ष शिवाजी व्यवहारे, चंद्रभान ठुबे, विजय काकडे, पोपट नवले, सचिन गाडीलकर, सुनील भालेकर, नियाज इनामदार, पोपट आतकर, शंकर ठुबे, सुनील भालेकर, संजू सोनावळे, तुषार सोनावळे, अंकुश ठुबे, भाना ठुबे, अरुण गायकवाड आदी उपस्थित होते.

Web Title: Visit to Bakde at Kanhur Plateau

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.