विसपुते सराफ ११ होतकरू विद्यार्थिनींना देणार सायकल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:25 AM2021-09-04T04:25:48+5:302021-09-04T04:25:48+5:30
कोपरगाव : विसपुते सराफ यांच्यावतीने चांदी दालन यंदा तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त तालुक्यातील ११ गुणवान, होतकरू विद्यार्थिनींना सायकल भेट देण्यात ...
कोपरगाव : विसपुते सराफ यांच्यावतीने चांदी दालन यंदा तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त तालुक्यातील ११ गुणवान, होतकरू विद्यार्थिनींना सायकल भेट देण्यात येणार आहे, असल्याची माहिती पेढीचे संचालक दीपक विसपुते यांनी दिली.
विसपुते म्हणाले, त्यानिमित्ताने कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील दहावी उत्तीर्ण ११ गुणवान होतकरू विद्यार्थिनींना सायकल सप्रेम भेट दिली जाणार आहे. आर्थिक दुर्बल घटकांतील गुणवान विद्यार्थिनींच्या महाविद्यालयीन उच्च शिक्षणात खंड पडू नये. त्यांना चांगल्या महाविद्यालयात जाण्या- येण्यासाठी ही सायकल उपयोगी पडेल या हेतूने हा उपक्रम आयोजित केले आहे. त्यासाठी कोपरगाव तालुक्यातील विविध जिल्हा परिषद शाळांच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधला आहे. तीन वर्षांपूर्वी विसपुते चांदी दालनाच्या उद्घाटन समारंभात तालुक्यातील क्रीडापटू विद्यार्थिनींचा सत्कार करून विसपुते सराफांनी वेगळ्या वाटेने जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थिनींचे-त्यांच्या पालकांचे मनोबल वाढविले होते. गुणवान मुली या त्या कुटुंबाच्याच नव्हे तर त्या गावाचाही अभिमान असतात. या भावनेतून आर्थिक दुर्बल घटकांतील गुणवान विद्यार्थिनींचे मनोबल वाढविण्यासाठी ११ विद्यार्थिनींना सायकल भेट दिली जाणार आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळेतून यंदा इयत्ता दहावी उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेल्या गुणवान, होतकरू विद्यार्थिनींच्या कौटुंबिक माहितीचे संकलन करून या सायकल सप्रेम भेट दिल्या जाणार आहेत. पेढीचे युवा संचालक यश विसपुते आणि प्रेम विसपुते यांनी या उपक्रमाची तयारी सुरू केली आहे. विश्वास, सचोटी, पारदर्शक व्यवहार आणि सामाजिक बांधिलकी मानणारी विसपुते सराफी पेढी ही उपक्रम शीलतेसाठी ओळखली जाते. या उपक्रमासाठी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांनी संबंधित विद्यार्थिनीची माहिती येत्या ५ सप्टेंबरपर्यंत विसपुते सराफ, धारणगाव रोड, कोपरगाव येथे पाठवावीत, असे आवाहन विसपुते सराफी पेढीच्यावतीने करण्यात आले आहे.