गोदावरी कालव्यांना तातडीने पाणी सोडावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:22 AM2021-02-09T04:22:32+5:302021-02-09T04:22:32+5:30

कोपरगाव : सद्यस्थितीत येथील विधानसभा मतदार संघात रब्बी हंगामातील पिकांना पाण्याची अत्यंत गरज आहे. शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यामध्ये ...

Water should be released to Godavari canals immediately | गोदावरी कालव्यांना तातडीने पाणी सोडावे

गोदावरी कालव्यांना तातडीने पाणी सोडावे

कोपरगाव : सद्यस्थितीत येथील विधानसभा मतदार संघात रब्बी हंगामातील पिकांना पाण्याची अत्यंत गरज आहे. शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यामध्ये मोठी अडचण येत आहे. गहू, हरभरा व ज्वारी या पिकांना पाणी देणे गरजेचे आहे. त्यामुळे गोदावरी कालव्यांना तातडीने पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कोल्हे म्हणाल्या, सध्याच्या परिस्थितीत वेळेत पाणी नसल्याने उभ्या पिकांचे नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार आहे. विजेचाही लपंडाव सुरू आहे. वैश्विक कोरोना महामारीमुळे शेतकऱ्यांच्या हातात आलेल्या पिकांना योग्य दर न मिळाल्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच खरीप हंगाम पूर्ण वाया गेला. त्यातून सावरत शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची पिके उभी केलेली आहे. मात्र, पाणी उशिराने सोडल्यास पिके वाया जाणार आहेत. राज्यात चालूवर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहे. त्यामुळे पाणी सोडण्यास उशीर न करता उपलब्ध असलेल्या पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांना व्हावा, यासाठी जलसंपदा विभागाने तातडीने कालव्यांना पाणी सोडणे गरजेचे आहे. पाणी उशिरा सोडल्यास उभ्या पिकांचे नुकसान होणार असल्याचे कोल्हे यांनी म्हटले आहे.

Web Title: Water should be released to Godavari canals immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.