डॉक्टरांच्या कुंटुंबियांच्या सुरक्षेचे काय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2021 04:18 AM2021-04-05T04:18:32+5:302021-04-05T04:18:32+5:30
अहमदनगर : कोरोनाच्या पहिल्या लाटेत आरोग्य कर्मचाऱ्यांची सुरुवातीला १४ दिवस आणि नंतर पाच दिवस क्वॉरंटाईनची व्यवस्था करण्यात आली होती. ...
अहमदनगर : कोरोनाच्या पहिल्या लाटेत आरोग्य कर्मचाऱ्यांची सुरुवातीला १४ दिवस आणि नंतर पाच दिवस क्वॉरंटाईनची व्यवस्था करण्यात आली होती. आता कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली असून, सध्या हे कर्मचारी दिवसभर कोविड सेंटरमध्ये काम करून घरी जातात. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेत खासगी डॉक्टरांची सेवा अधिग्रहित करण्यात आली होती. या डॉक्टरांची नेमणूक कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी करण्यात आली होती. सुरुवातीच्या काळात या डॉक्टरांची क्वॉरंटाईनची व्यवस्था करण्यात आली होती. दुसऱ्या लाटेत मात्र ही काळजी घेतली जात नाही. कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे उपचार घेणाऱ्या रुग्णांचीही संख्या वाढली असून, वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेविका, वॉडबॉय, सुरक्षारक्षक, सफाई कर्मचाऱ्यांची कमतरता भासत आहे. महापालिकेने मानधनावर डॉक्टरांची नेमणूक केली आहे. हे सर्व कर्मचारी दिवसभर कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांची तपासणी करणे, त्यांना गोळ्या, औषधे देणे आदी कामे करतात. आपले काम संपल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांसह सर्व कर्मवारी घरी जातात. यावेळी घरात लहान मुले, ज्येष्ठ, वयोवृद्ध असतात. त्यामुळे त्यांना कमालीची काळजी घ्यावी लागते. कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्याने अशा रुग्णांची भेट घेणे टाळले जाते. परंतु, या आरोग्य सेवकांना रुग्णांसाेबत काम करावे लागत असल्याने त्यांच्या कुटुंबामध्ये कमालीची धाकधूक आहे. घरातील कुणी आजारी पडले तर काय करायचे, असा प्रश्न त्यांच्या कुटुंबासमोर आहे. आरोग्यसेवक जीव धोक्यात घालून काम करत आहेत. त्यांच्या या कामामुळे कुटुंबाच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
....
अशी आहे रुग्णसंख्या
नटराज - ८०, जैन पितळे बोर्डींग - २१, डॉन बास्को - ५६
...
वैद्यकीय अधिकारी - ०४, आरोग्यसेविका - ११, वार्डबॉय - ०३, सफाई कर्मचारी - ०९
....
- कोविड केअर सेंटरमध्ये काम करताना पीपीई कीट व मास्कचा वापर करतो. पीपीई कीट घालून राऊंड घेतल्यानंतर पीपीई कीट, ग्लोव्हज् काढून टाकतो. तिथे सॅनिटाईज करून घरी आल्यानंतर शुज बाजूला काढून ठेवतो. कपडे गरम पाण्यात टाकून साबणाने आंघोळ करतो. घरात माझ्या दोन छोट्या मुली आहेत. मी आंघोळ करेपर्यंत त्या माझ्याकडे येत नाहीत. त्यांनाही आता सवय झाली आहे. अशीच दररोज काळजी घेतो. ही काळजी नियमित घ्यावीच लागते.
- डॉ. प्रदीप कळमकर, वैद्यकीय अधिकारी
......
- कोविड सेंटरमध्ये काम करताना पीपीई कीट घातलेले असते. राऊंड झाल्यानंतर स्वत: सॅनिटाईज करतो. त्यानंतर घरी गेल्यानंतर कपडे गरम पाण्यात टाकून आंघोळ करतो. घरात आई-वडील आहेत, त्यांची काळजी घेतो. ठराविक अंतर ठेवून घरात गुण्यागोविंदाने राहतो.
- डॉ. सुजोत सैदाने, वैद्यकीय अधिकारी
...
डमी - नेट फोटोत
०३ हेल्थ स्टाफ ॲण्ड कोरोना डमी
कोविड सेंटर
डॉक्टर
कोरोना स्टाफ
-----------