लोकमत न्यूज नेटवर्कसंगमनेर : मी वर्षातून एकदा बैठक बोलवतो, त्या बैठकीला तुम्हाला उपस्थित राहता येत नसेल तर तुम्ही जनतेची कामे काय करणार? असे माजी महसूलमंत्री, आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले.
सोमवारी (दि.१८) येथील यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनातील सभागृहात संगमनेर तालुक्यातील दुष्काळ सदृश परिस्थिती संदर्भाने टंचाई आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला प्रांताधिकारी आणि तहसीलदार हे दोन्ही प्रमुख अधिकारी अनुपस्थित असल्याने आमदार थोरात चांगलेच संतापले होते.
तुम्हाला अधिकारी सतत समोर पाहिजेत का?पालकमंत्री त्रास द्यायला नसतात. त्यांनी नेहमी पालकांच्या भूमिकेत असावे. तुम्ही जिल्ह्यात आल्यानंतर तुम्हाला अधिकारी सतत समोर पाहिजेत का? असेही आमदार थोरात म्हणाले. प्रांताधिकारी हिंगे, तहसीलदार मांजरे हे बैठकीला अनुपस्थित असताना इतर महत्वाच्या विभागाचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते.