कोपरगाव नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. शहरवासीयांसह नगर परिषद कर्मचाऱ्यांची मोठी कुचंबणा होत असल्याने या इमारतीचे कामासाठी निधी मिळावा म्हणून कोल्हे यांनी पत्रव्यवहार व पाठपुरावा करून या कामासाठी निधी मिळविला होता. त्यानुसार या निधीतील पहिल्या रकमेचा हप्ता २ कोटी प्राप्त झाल्याने नगर परिषद इमारतीच्या कामाला सुरुवात होऊन या कामासाठी टप्प्याटप्प्याने मंजूर निधी मिळणे क्रमप्राप्त आहे. त्यासाठी आम्ही निधी मिळविला म्हणणे केवळ दिशाभूल करून जनतेला वेड्यात काढण्याचे काम आहे. यापूर्वीही या कामासाठी निधी मिळविल्याचा डांगोरा पिटवून जनतेला वेड्यात काढले. नाट्यगृहाच्या कामाकडे दुर्लक्ष करून सदरचा निधी प्रशासकीय इमारतीच्या कामासाठी वळवून शहरातील नाट्यरसिकांचा भ्रमनिरास केला असून, निधी मिळविल्याचा कांगावा करून जनतेची दिशाभूल केली, असेही निखाडे म्हणाले.
कोल्हे यांनी मंजूर केलेल्या कामाचे श्रेय घेऊ नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 4:21 AM