पिंपळगाव माळवीत मुख्यमंत्री सडक योजनेचे काम रेंगाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:19 AM2021-02-13T04:19:45+5:302021-02-13T04:19:45+5:30
या कामासाठी २०८.९८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या रस्त्याचे काम सुरू झाले आहे. दुसरा रस्ता पिंपळगाव माळवी ...
या कामासाठी २०८.९८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या रस्त्याचे काम सुरू झाले आहे. दुसरा रस्ता पिंपळगाव माळवी ते सटवाई मंदिर हा २.५ किलोमीटर लांबीचा आहे. या कामासाठी १५१.१९ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. या दोन्हीही रस्त्यांचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते फेब्रुवारी २०१९ ला भूमिपूजन झाले आहे. या कामांचा कार्यारंभ सप्टेंबर २०१९ आहे. काम पूर्ण होण्याचा दिनांक मार्च २०२१ आहे. परंतु या कामांमधील सटवाई रस्त्याचे काम सुरू होऊन एक वर्ष झाले, परंतु या रस्त्यावरील शेतकऱ्यांना डिसेंबर २०२० मध्ये भूमी अभिलेख खात्याकडून मोजणीच्या नोटिसा आल्या आहेत. शासकीय परिपत्रकानुसार कार्यारंभ देण्याअगोदर शासकीय यंत्रणेने जागेची पाहणी करून जागा योग्य आहे की नाही व जमिनीची मोजणी होणे आवश्यक असते. परंतु तसे केले आहे.
..
निधीचा अपव्यय
पिंपळगाव माळवी येथील सटुबाई मंदिर रस्त्याच्या कामामध्ये प्रशासनाने वरातीमागून घोडे दामटले आहे. २.५ किलोमीटर अंतराच्या रस्त्यापैकी अर्धा किलोमीटर रस्त्याचा नकाशामध्ये उल्लेखच आढळत नाही. त्यामुळे या रस्त्यांची कामे अर्धवट अवस्थेत पडून आहेत. स्थानिक प्रशासन व जिल्हा प्रशासनातील समन्वयाअभावी निधीचा अपव्यय होत आहे. जिल्हा प्रशासनाने यामध्ये दखल देऊन हे काम त्वरित मार्गी लावावे, अशी ग्रामस्थांनी मागणी केली आहे.
....
फोटो-१२ पिंपळगाव माळवी रोड
...
ओळ : पिंपळगाव माळवी येथे मुख्यमंत्री सडक योजनेतील अपूर्ण रस्त्याचे काम.