देवदर्शनासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; नगर-मनमाड रोडवर अपघात, २ ठार, ३ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2022 10:32 AM2022-03-07T10:32:10+5:302022-03-07T10:33:40+5:30

नगर-मनमाड रोडवरील देहरे शिवारात ट्रेलरमधील पवनचक्कीसाठी वापरला जाणारा पंखा बोलेरो गाडीवर पडून झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले असून, तीन जण जखमी झाले आहेत.

accident on nagar manmad road 2 killed 3 injured | देवदर्शनासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; नगर-मनमाड रोडवर अपघात, २ ठार, ३ जखमी

देवदर्शनासाठी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला; नगर-मनमाड रोडवर अपघात, २ ठार, ३ जखमी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर: नगर- मनमाड रोड वरील देहरे शिवारात ट्रेलरमधील पवनचक्कीसाठी वापरला जाणारा पंखा बोलेरो गाडीवर पडून झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले असून, तीन जण जखमी झाले आहेत. हा अपघात पहाटेदीड वाजेच्या सुमारास झाला.

सुशीला विलास रासकर (रा.खंडाळा ता. श्रीरामपूर), श्याम बाळासाहेब रासकर( रा.खंडाळा ता. श्रीरामपूर ) असे मयताची नावे आहेत. तसेच विलास अविनाश रासकर,आनंद विलास रासकर, शिल्पा शाम (सर्व राहणार खंडाळा ता. श्रीरामपूर) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.

त्यांना पुढील उपचारासाठी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. श्रीरामपूर तालुक्यातील रासकर कुटुंबीय देवदर्शनासाठी निघाले होते. नगर कडून मनमाड कडे जात असलेल्या ट्रेलरमधून पवनचक्की साठीचा पंखा बोलेरो गाडीवर समोरून पडला. त्यामुळे झालेल्या अपघातात दोघे जण जागीच ठार झाले असून तिघे जण जखमी झाले आहेत.
 

Web Title: accident on nagar manmad road 2 killed 3 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.