सहायक फौजदारास आरोपीकडून मारहाण

By admin | Published: July 27, 2016 12:09 AM2016-07-27T00:09:59+5:302016-07-27T00:39:33+5:30

अहमदनगर : जिल्हा न्यायालयात घेऊन येत असताना दोघा आरोपींनी पोलीस मुख्यालयातील सहायक फौजदार बंडू चितळकर यांना मारहाण करत धमकी दिली़

Assistant fugitive assaulted by the accused | सहायक फौजदारास आरोपीकडून मारहाण

सहायक फौजदारास आरोपीकडून मारहाण

Next


अहमदनगर : जिल्हा न्यायालयात घेऊन येत असताना दोघा आरोपींनी पोलीस मुख्यालयातील सहायक फौजदार बंडू चितळकर यांना मारहाण करत धमकी दिली़ सोमवारी बारा वाजेच्या सुमारासह ही घटना घडली़ आरोपींविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
आरोपी संजय शिवाजी ढापसे, सरफोद्दीन निजामोद्दीन सुबेदार, अशोक उर्फ पिंटू साहेबराव गायकवाड (सर्व रा़ सबजेल) यांना पोलिसांनी न्यायालयात आणल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना लॉकअपमध्ये ठेवत असताना आरोपींनी त्यास विरोध केला़
आम्हाला लॉकअपमध्ये न ठेवता थेट न्यायालयात का दाखल करत नाही, असे म्हणत सरफोद्दीन सुबेदार व अशोक गायकवाड यांनी सहायक फौजदार चितळकर यांची गचांडी पकडून तोंडावर मारहाण केली़ तसेच शिविगाळ करत मारहाण केली़ घटनेनंतर चितळकर यांच्या फिर्यादीवरून तिघा आरोपींविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
न्यायालय परिसरात आरोपींकडून पोलिसांवर थेट हात उचलला जात असल्याने सुरक्षेचा प्रश्न पुढे आला आहे़
(प्रतिनिधी)

Web Title: Assistant fugitive assaulted by the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.