शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार, उद्धव ठाकरे, सोनिया गांधी, कुणी दिली होती पंतप्रधान पदाची ऑफर? नितीन गडकरी म्हणाले...
2
Maharashtra Politics : 'अमित शहांना पवार, ठाकरेंना राजकीयदृष्ट्या संपवण्याचे डोहाळे लागलेत'; ठाकरे गटाचा सामनातून हल्लाबोल
3
"अमित शाह सांगतील तो महायुतीचा मुख्यमंत्री होईल", भाजपाच्या वरिष्ठ नेत्याचं विधान
4
Investment tips : १० हजारांवरून १० कोटी कसे मिळवायचे? 'धनकुबेर' बनण्याचा फॉर्म्युला समजून घ्या
5
सदोष वेल्डिंग, कमकुवत ढाचामुळे कोसळला पुतळा; चौकशी समितीच्या अहवालात निष्कर्ष
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी करणार्‍यांना लाभाच्या संधी मिळतील; नशिबाची साथ लाभेल
7
पोर्न स्टार रिया बर्डे निघाली बांगलादेशी, बनावट कागदपत्रांसह भारतात राहिल्या प्रकरणी केली अटक
8
विधानसभा निवडणुकीचे वेध; आयोगाची आज पक्षांशी चर्चा, मुख्य सचिव, वरिष्ठ अधिकारी यांची बैठकही घेणार
9
अग्रलेख : विकास किती पाण्यात?; ‘स्मार्ट सिटी’ बनणाऱ्या शहरांना किंचितही अधिकसा पाऊस सोसवेनासा
10
बिल्किस बानो प्रकरणी फेरआढाव्याची गरज नाही; सुप्रीम काेर्टाने फेटाळली गुजरात सरकारची याचिका
11
मेडिकलच्या तीन मुलींनी घेतली सहा जणांची रॅगिंग; मुली एमडी अभ्यासक्रमाच्या
12
लोकमतच्या व्यासपीठावर सर्वपक्षीय नेत्यांची जुगलबंदी; विधानसभेनंतर आणखी पक्ष आमच्याकडे येतील : मुनगंटीवार
13
ड्युटीवरून गायब झालेले १२ पोलिस निलंबित; आरबीआयच्या संरक्षणाची होती जबाबदारी
14
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
15
कॅन्सरवरील उपचार सुसह्य होण्यासाठी आता ‘डॉग थेरपी’; टाटा रुग्णालयात मुलांसाठी अनोखा उपक्रम
16
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
17
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
18
शासकीय रुग्णालयांत हृदयविकारांवर अत्याधुनिक उपचार; जे.जे. मध्येही आता ईपी लॅब, ३९ कोटी मंजूर
19
नऊ प्रकल्पांच्या निधीची चिंता मिटली; एमएमआरडीएला ‘पीएफसी’कडून ३१,६७३ कोटींचे कर्ज मंजूर
20
नवी मुंबई विमानतळ सुखोईच्या लँडिंगसाठी सज्ज; सिडकोचे विजय सिंघल यांची माहिती

आढळगावात पुतळ्याचे दहन, कोळगावात बंद

By admin | Published: July 19, 2016 11:36 PM

श्रीगोंदा : कोपर्डी येथील छकुली आमच्या घरातील लेकरू होते. या निरपराध लेकराला हाल हाल करून मारणाऱ्यांना पोलिसांनी मोकाट सोडल्यास आरोपींच्या नरडीचा घोट घेऊ,

श्रीगोंदा : कोपर्डी येथील छकुली आमच्या घरातील लेकरू होते. या निरपराध लेकराला हाल हाल करून मारणाऱ्यांना पोलिसांनी मोकाट सोडल्यास आरोपींच्या नरडीचा घोट घेऊ, अशा संतप्त भावना आढळगाव येथील महिलांनी व्यक्त केली महिला व शाळकरी मुलींनी आरोपींच्या प्रतीकात्मक पुतळ्याची गावातून प्रेतयात्रा काढून गांधी चौकात या पुतळ्याला चपलांचा प्रसाद देऊन दहन करण्यात आले. कोपर्डी येथील अत्याचारित छकुलीला श्रध्दांजली अर्पण आली. याप्रसंगी महिला आणि शाळकरी मुलींना भावना आवरता आल्या नाहीत. वृध्द महिलांचे पदर अश्रूंनी ओले झाले.पंचायत समिती सदस्या अनुराधा ठवाळ म्हणाल्या, घटनास्थळी भेट दिल्यानंतर प्रत्येक व्यक्तीच्या मनात चीड आणि डोळ्यात रक्त उतरल्याशिवाय राहत नाही. सरपंच मीरा वाकडे म्हणाल्या, घडलेली घटना निंदनीय असून या बालिकेवर आलेला प्रसंग डोळ्यासमोर आला तर झोप उडून जाते. ग्रामपंचायत सदस्या सुजाता वाकडे म्हणाल्या, समाजातील अशा प्रकारची विकृती नष्ट करण्यासाठी आता महिलांनाच पुढाकार घ्यावा लागणार आहे.विद्यार्थिनी पल्लवी भोसले म्हणाली, कोपर्डी घटनेने माझ्यासारख्या शेकडो मुलींना आपण असुरक्षित आहोत अशी भावना निर्माण झाली आहे. यावेळी कुंदा जगधने, जयश्री निकम, सुजाता लोणकर, छाया चव्हाण, विजया गव्हाणे, छाया गव्हाणे, सीमा उबाळे, शोभा बंड, लक्ष्मी जाधव, शायरा इनामदार, वैशाली जमदाडे, शुभांगी छत्तीसे, विजया दळवी, प्रिया बोत्रे, शोभा थोरात, कविता सूर्यवंशी, शारदा वाकडे, वंदना पंडित, कविता चव्हाण तसेच विद्यालयातील विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.कोळगावात बंदकोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, म्हणून कोळगाव येथे मंगळवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. निषेध सभेत हेमंत नलगे, भैय्या लगड, सुभाष लगड, विश्वनाथ थोरात, विजय नलगे, दादा निर्फळ, नितीन नलगे यांची भाषणे झाली श्रीगोंदा फॅक्टरीवर बंद युवकांनी श्रीगोंदा फॅक्टरीवर केलेल्या बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. श्रीगोंदा फॅक्टरी व ढोकराई येथील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, सभापती अर्चना पानसरे, उपसभापती संध्या जगताप, गटविकास अधिकारी अलका शिरसाठ, अ‍ॅड. सुनील भोस, राजू पाटील, सुभाष शिंदे यांनी मंगळवारी भेट दिली. आमदार राहुल जगताप, माजी मंत्री बबनराव पाचपुते, सेनेचे घनश्याम शेलार, जि.प. उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, अनिल ठवाळ यांनी पीडित कुटुंबाचे सांत्वन केले. (तालुका प्रतिनिधी)