मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

By admin | Published: July 18, 2016 12:49 AM2016-07-18T00:49:30+5:302016-07-18T00:55:13+5:30

कर्जत : कोपर्डी येथील घटनेची नैतिक जबाबदारी स्विकारून मुख्यमंत्री व पालकमंत्री यांनी राजीनामे द्यावेत.

The Chief Minister should resign | मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

Next

कर्जत : कोपर्डी येथील घटनेची नैतिक जबाबदारी स्विकारून मुख्यमंत्री व पालकमंत्री यांनी राजीनामे द्यावेत. या घटनेतील सर्व आरोपींना दोन दिवसात अटक झाली नाही तर राज्यभर महिला काठ्या घेऊन रस्त्यावर उतरतील, असा इशारा भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी दिला.
कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे त्या त्यांच्या सहकारी महिलांसह आल्या होत्या. त्यांनी पीडितेच्या घराची पाहणी केली तसेच मृतदेह टाकलेली जागा, अत्याचार झालेल्या जागेची पाहणी केली. पीडित कुटुंबातील महिलांनी समस्यांचा पाढा त्यांच्यापुढे वाचला. येथील घटनेची सर्व हकीकत ऐकून तृप्ती देसाई सुन्न झाल्या. यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, असे प्रकार मनुष्य प्राणी करू शकतात यावर विश्वासच बसत नाही. कोपर्डी येथील घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व या जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी राम शिंदे यांनी राजीनामे द्यावेत. या प्रकरणातील सर्व आरोपींना दोन दिवसात अटक करावी अन्यथा महिला दुर्गेचे रूप घेऊन राज्यभर रस्त्यावर उतरतील असा इशारा त्यांनी दिला. या प्रकरणाची महिला आयोगाने दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. रविवारी कोपर्डी येथे पीडित कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन करण्यासाठी रीघ लागली होती. यामध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा गुंड, सेनेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे, छावा संघटनेचे सर्वेसर्वा आबासाहेब पाटील आदींचा समावेश होता.
नामसाधर्म्यामुळे बदनामी
जामखेड : कोपर्डी प्रकरणातील आरोपी संतोष भवाळ हा जलसंधारणमंत्री राम शिंदे यांचा कार्यकर्ता असल्याचा फोटो सोशल मीडियावर तसेच काही वृत्तवाहिन्यांवर दाखविण्यात आला, परंतु या फोटोतील संतोष भवाळ हे या घटनेतील आरोपी नाहीत. त्यामुळे या संतोष दादा भवाळ यांनी बदनामी झाल्याची फिर्याद जामखेड पोलीस ठाण्यात दिली आहे़
कोपर्डी प्रकरणातील ‘तो’ आरोपी हा जलसंधारणमंत्री राम शिंदे यांचा कार्यकर्ता असल्याचा फोटो सोशल मीडियातून सकाळपासून फिरत होता. मात्र, सोशल मीडियातून फिरणाऱ्या फोटोतील संतोष भवाळ हा आरोपी नसून तो दुसरीच व्यक्ती असल्याचे दुपारी उघड झाले. ते नान्नज येथील रहिवासी आहेत. कोपर्डी घटनेतील आरोपीच्या नामसाधर्म्यामुळे त्याची बदनामी झाली आहे़ जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्याबरोबर असलेला फोटो हा आरोपीचा नाही. नान्नजचे संतोष भवाळ हे पुणे येथे वडापावची गाडी चालवितात. त्यांचे वडील नान्नज ग्रामपंचायतचे सदस्य आहेत. त्यांच्या आजी पाच वर्षांपूर्वी नान्नज ग्रामपंचायतीच्या सरपंच होत्या. त्यांचे खरे नाव दादा उर्फ संतोष नाना भवाळ आहे. नान्नज गावातील रथयात्रेसाठी ते दोन दिवसांपूर्वी गावी आले आहेत. आज त्यांचा वाढदिवसही होता. माझी व मंत्री राम शिंदे यांची आणखी बदनामी होऊ नये म्हणून त्यांनी जामखेड पोलिसात रितसर तक्रार दिली आहे. सोशल मीडिया व वृत्तवाहिन्यांवर जी बदनामी झाली आहे, याबाबत पोलिसांनी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल केला आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The Chief Minister should resign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.