शहरं
Join us  
Trending Stories
1
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
2
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
3
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
4
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
5
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
6
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
7
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
8
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
9
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
10
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
11
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
12
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
13
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
14
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
15
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
16
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
17
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
18
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
19
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
20
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

By admin | Published: July 18, 2016 12:49 AM

कर्जत : कोपर्डी येथील घटनेची नैतिक जबाबदारी स्विकारून मुख्यमंत्री व पालकमंत्री यांनी राजीनामे द्यावेत.

कर्जत : कोपर्डी येथील घटनेची नैतिक जबाबदारी स्विकारून मुख्यमंत्री व पालकमंत्री यांनी राजीनामे द्यावेत. या घटनेतील सर्व आरोपींना दोन दिवसात अटक झाली नाही तर राज्यभर महिला काठ्या घेऊन रस्त्यावर उतरतील, असा इशारा भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी दिला.कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे त्या त्यांच्या सहकारी महिलांसह आल्या होत्या. त्यांनी पीडितेच्या घराची पाहणी केली तसेच मृतदेह टाकलेली जागा, अत्याचार झालेल्या जागेची पाहणी केली. पीडित कुटुंबातील महिलांनी समस्यांचा पाढा त्यांच्यापुढे वाचला. येथील घटनेची सर्व हकीकत ऐकून तृप्ती देसाई सुन्न झाल्या. यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, असे प्रकार मनुष्य प्राणी करू शकतात यावर विश्वासच बसत नाही. कोपर्डी येथील घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व या जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी राम शिंदे यांनी राजीनामे द्यावेत. या प्रकरणातील सर्व आरोपींना दोन दिवसात अटक करावी अन्यथा महिला दुर्गेचे रूप घेऊन राज्यभर रस्त्यावर उतरतील असा इशारा त्यांनी दिला. या प्रकरणाची महिला आयोगाने दखल घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. रविवारी कोपर्डी येथे पीडित कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन करण्यासाठी रीघ लागली होती. यामध्ये प्रामुख्याने जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा गुंड, सेनेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत गाडे, छावा संघटनेचे सर्वेसर्वा आबासाहेब पाटील आदींचा समावेश होता.नामसाधर्म्यामुळे बदनामीजामखेड : कोपर्डी प्रकरणातील आरोपी संतोष भवाळ हा जलसंधारणमंत्री राम शिंदे यांचा कार्यकर्ता असल्याचा फोटो सोशल मीडियावर तसेच काही वृत्तवाहिन्यांवर दाखविण्यात आला, परंतु या फोटोतील संतोष भवाळ हे या घटनेतील आरोपी नाहीत. त्यामुळे या संतोष दादा भवाळ यांनी बदनामी झाल्याची फिर्याद जामखेड पोलीस ठाण्यात दिली आहे़कोपर्डी प्रकरणातील ‘तो’ आरोपी हा जलसंधारणमंत्री राम शिंदे यांचा कार्यकर्ता असल्याचा फोटो सोशल मीडियातून सकाळपासून फिरत होता. मात्र, सोशल मीडियातून फिरणाऱ्या फोटोतील संतोष भवाळ हा आरोपी नसून तो दुसरीच व्यक्ती असल्याचे दुपारी उघड झाले. ते नान्नज येथील रहिवासी आहेत. कोपर्डी घटनेतील आरोपीच्या नामसाधर्म्यामुळे त्याची बदनामी झाली आहे़ जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्याबरोबर असलेला फोटो हा आरोपीचा नाही. नान्नजचे संतोष भवाळ हे पुणे येथे वडापावची गाडी चालवितात. त्यांचे वडील नान्नज ग्रामपंचायतचे सदस्य आहेत. त्यांच्या आजी पाच वर्षांपूर्वी नान्नज ग्रामपंचायतीच्या सरपंच होत्या. त्यांचे खरे नाव दादा उर्फ संतोष नाना भवाळ आहे. नान्नज गावातील रथयात्रेसाठी ते दोन दिवसांपूर्वी गावी आले आहेत. आज त्यांचा वाढदिवसही होता. माझी व मंत्री राम शिंदे यांची आणखी बदनामी होऊ नये म्हणून त्यांनी जामखेड पोलिसात रितसर तक्रार दिली आहे. सोशल मीडिया व वृत्तवाहिन्यांवर जी बदनामी झाली आहे, याबाबत पोलिसांनी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अब्रुनुकसानीचा गुन्हा दाखल केला आहे. (तालुका प्रतिनिधी)