खर्डा शहरात कडकडीत बंद

By admin | Published: July 18, 2016 12:48 AM2016-07-18T00:48:37+5:302016-07-18T00:53:45+5:30

खर्डा : कोपर्डी, ता.कर्जत येथे अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीवर झालेल्या पाशवी बलात्कार व खुनाच्या निषेधार्थ खर्डा शहर १०० टक्के बंदला प्रतिसाद मिळाला.

In the Kharda city, it is closed | खर्डा शहरात कडकडीत बंद

खर्डा शहरात कडकडीत बंद

Next

खर्डा : कोपर्डी, ता.कर्जत येथे अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीवर झालेल्या पाशवी बलात्कार व खुनाच्या निषेधार्थ खर्डा शहर १०० टक्के बंदला प्रतिसाद मिळाला.
जामखेड तालुक्यातील मोठ्या व सतत गजबजलेल्या बाजारपेठेत पूर्णपणे शुकशुकाट होता. गावकऱ्यांच्या बोलण्यातून सदर घटनेविरोधात चर्चा व हळहळ सुरू होती. खर्डा बसस्थानकावर निषेध सभा घेण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस विजयसिंह गोलेकर, मा.शिवसेना तालुका प्रमुख वैजिनाथ पाटील, राष्ट्रवादी शहराध्यक्ष संतोष लष्करे, स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष सुनील लोंढे, आरपीआय तालुका प्रमुख बाळासाहेब शिंदे, शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष रावसाहेब खोत, क्रांतीसुर्य लहुजी वस्ताद संघटना प्रमुख बाबासाहेब मोरे, संभाजी ब्रिगेड जि.प. प्रमुख गणेश शिंदे, राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष कल्याण सुरवसे, खर्डा सेवा सो.चेअरमन चंद्रकांत गोलेकर, व्हा.चेअरमन श्रीकांत लोखंडे, सुरेश ढेरे, प्रकाश गोलेकर, सुधीर शेडके, गहिनीनाथ खरात, गणेश सुळ आदींनी सदर घटनेचा निषेध करत दोषींना फाशीची शिक्षा होण्याची मागणी केली.
यावेळी अत्यावश्यक सेवा सोडता सर्व व्यवहार बंद ठेऊन व्यापारी, ग्रामस्थांनी निषेध नोंदवला. पोलीस निरीक्षक अरुण परदेशी, उपनिरीक्षक नामदेव सहारे, पो.हे.कॉ. दिनकर पवार सह मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. (वार्ताहर)

Web Title: In the Kharda city, it is closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.