निविदा कोटीची अन् उड्डाणे लाखोंची

By admin | Published: July 24, 2016 11:46 PM2016-07-24T23:46:37+5:302016-07-25T00:05:37+5:30

श्रीगोंदा : श्रीगोंद्याच्या नगराध्यक्षपदासाठी ३० जुलैला निवडणूक होत आहे. पालिकेतील ३३ कोटींच्या रस्त्याच्या टेंडरवर डोळा ठेवून नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांनी फिल्डींग लावली आहे.

Lakhs of Tender Crores | निविदा कोटीची अन् उड्डाणे लाखोंची

निविदा कोटीची अन् उड्डाणे लाखोंची

Next

श्रीगोंदा : श्रीगोंद्याच्या नगराध्यक्षपदासाठी ३० जुलैला निवडणूक होत आहे. पालिकेतील ३३ कोटींच्या रस्त्याच्या टेंडरवर डोळा ठेवून नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांनी फिल्डींग लावली आहे. या निवडीत लाखोंची उड्डाणे सुरू झाली आहेत. त्यामुळे नगराध्यक्षपदाची निवडणूक अटीतटीची होण्याचे संकेत आहेत.
पालिकेत सत्ताधारी गटाचे आठ तर विरोधी गटाचे दहा नगरसेवक आहेत. दीड महिन्यापूर्वी झालेल्या नगराध्यक्ष निवडीत विरोधकांचे प्रयत्न निष्फळ ठरले. परिणामी नगराध्यक्षपदाची माळ भाजपाच्या सुनीता शिंदे यांच्या गळ्यात पडली. मात्र या निवडणुकीत राज्य साखर संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे व कुकडी साखर कारखान्याचे संस्थापक कुंडलिक जगताप यांनी एकत्र मूठ बांधण्यासाठी नगरसेवकांची बैठक घेतली. त्यामुळे विरोधी गटाच्या आशा वाढल्या आहेत. माजी मंत्री बबनराव पाचपुते व बाबासाहेब भोस यांच्या मार्गदर्शनाखाली मनोहर पोटे यांनी सुरुवातीपासून बेरजेच्या राजकारणासाठी डावपेच टाकले आहेत.
बबनराव पाचपुते यांच्या प्रयत्नातून शहरातील १७ रस्त्यांच्या कामासाठी ३३ कोटी मंजूर झाले आहेत. या कामाच्या फेरनिविदा निघणार आहेत. या निविदेमधील अर्थकारणाचा हिशोब करून नगराध्यक्षपदाचे उमेदवार मनोहर पोटे व फक्कड मोटे यांनी शेवटच्या टप्प्यात निराळ्या पध्दतीने व्यूहरचना आखली आहे. त्यामुळे या निवडीत लाखोंची उड्डाणे सुरू झाली आहेत. त्यामुळे दिवसाला शेअर बाजाराप्रमाणे मतांचा निर्देशांक बदलत आहे. अर्थकारणाभोवती फिरणाऱ्या या निवडणुकीत कोणते नगरसेवक नेत्यांचा शब्द प्रमाण मानतात तर कोणते नगरसेवक ‘नोट फॉर ओट’ वर शिक्कामोर्तब करतात, हा चर्चेचा विषय बनला आहे.
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Lakhs of Tender Crores

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.