शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
2
“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज
3
बाबा राम रहिमने पुन्हा मागितला २० दिवसांचा पॅरोल, हरियाणा विधानसभा निवडणुकीवर होणार परिणाम   
4
तरुणांसाठी खुशखबर! महिन्याला मिळणार ५ हजार रुपये, केंद्र सरकारने केली मोठी घोषणा
5
झेड प्लस सुरक्षा नाकारून एकनाथ शिंदेंना शहीद करायचे होते; संजय शिरसाटांचा रोख कुणाकडे?
6
काचेच्या कारखान्यात माल उतरवताना काचा फुटल्याने अपघात; ४ कामगारांचा मृत्यू, येवलेवाडीतील घटना
7
ठाकरे सेनेच्या 'विजयी धमाक्या'ने शिंदेसेनेत खळबळ; 'सिनेट' निकालाने 'आदित्य ब्रिगेड'ला बळ, मुंबईत देणार धक्का?
8
अयोध्येतील पराभवावर गृहमंत्री अमित शाह पहिल्यांदाच बोलले, हरियाणात केलं मोठं विधान
9
PAK vs ENG : इंग्लंडचा पाकिस्तान दौरा! पण आधीच मोहम्मद युसूफचा राजीनामा; कारणही सांगितलं
10
IND vs BAN : यंत्रणेअभावी मैदान सुकेना! मग नेटकऱ्यांनी जपला BCCI च्या ट्रोलिंगचा 'मंत्र'
11
भाषण देताना मल्लिकार्जुन खरगे व्यासपीठावर बेशुद्ध पडले; म्हणाले, "मी ८३ वर्षांचा आहे, मोदींना सत्तेवरून..."
12
“...तर राजकीय एन्काउंटर करु, आमच्या भानगडीत पडू नका”; मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा
13
मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार? भव्य कार्यक्रम अन् शक्तिप्रदर्शन, तयारीला वेग!
14
PM मोदींची देशाला मोठी भेट, 500 नवीन इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनचे केले उद्घाटन....
15
video: ऑन ड्युटी पोलिस कॉन्स्टेबलला चिरडले, फरफटत नेले...उपचारादरम्यान मृत्यू
16
Ayushman Card : कोणत्या हॉस्पिटलमधून 'आयुष्मान भारत योजनेतून' मोफत उपचार होणार? जाणून घ्या प्रोसेस
17
नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जागतिक दहशतवादी हाशिम सफीद्दीन बनला हिजबुल्लाचा प्रमुख
18
"जर निवडणूक जिंकलो तर...!"; डोनाल्ड ट्रम्प Google वर भडकले, दिला थेट इशारा
19
IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना खुशखबर; कोणता संघ कोणाला रिटेन करणार, वाचा
20
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून

यंदा होऊन जाऊ द्या, शुभमंगल सावधान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2022 1:10 PM

२६ नोव्हेंबरपासून २८ जून २०२३ पर्यंत लग्नाचे तब्बल ५७ मुहूर्त आहेत.

अहमदनगर : दोन वर्षांपासून बंद असलेला लग्न समारंभातील थाटमाट पुन्हा सुरू झाला आहे. यंदा २६ नोव्हेंबरपासून विवाह मुहूर्त असले तरी तुळशीविवाह सुरू होताच नगरमध्ये विवाह समारंभ धूमधडाक्यात सुरू झाले आहेत. वधू-वरांच्या पित्यांकडून मंगल कार्यालये आरक्षित झालेली आहेत. डीजे, घोडा, आचारी, केटरर्स, विद्युत रोषणाई यासाठी आवश्यक नियोजन केले आहे. २६ नोव्हेंबरपासून २८ जून २०२३ पर्यंत लग्नाचे तब्बल ५७ मुहूर्त आहेत.

पंचांगानुसार लग्नतिथीमहिना - लग्नतिथीनोव्हेंबर २६, २७, २८, २९डिसेंबर २, ४, ९,१४, १६, १७, १८जानेवारी (२०२३) १८, २६, २७, ३१फेब्रुवारी ६, ७, १०, ११, १४, १६, २२, २३, २४, २७, २८मार्च ८, ९, १३, १७, १८मे २, ३, ४, ७, ८, १०, ११, १२, १५, १६, २१, २२, २९, ३०जून १, ३, ७, ८, ११, १२, १३, १४, २३, २६, २७, २८(गुरुचा अस्त असल्याने यंदा एप्रिलमध्ये मुहूर्त नाहीत.)

तुळशीचे लग्न यंदा चार दिवसदिवाळी झाल्यानंतर कार्तिक शुद्ध एकादशी येते. तुळशीविवाह सुरू झाले आहेत. ४,५,६ आणि ७ नोव्हेंबर यादरम्यान तुळशीविवाह आहे. मंगळवारी (दि. ८) खंडग्रास चंद्रग्रहण आहे. तसेच पौर्णिमा दुपारी ४.३१ पर्यंतच आहे. तुळशीविवाह सुरू झाले की विवाह मुहूर्त सुरू होतात.

सहा महिने आधीच मंगल कार्यालयांचे बुकिंगकोरोना अथवा इतर कोणतेही निर्बंध नसल्याने वर-वधू पक्षाकडून लग्नाचे नियोजन मागील काही महिन्यांपासून सुरू होते. काही यजमान कुटुंबांनी मंगल कार्यालयासह आचारी, केटरिंग, इतर व्यवस्थेची बुकिंग केली आहे.

आचाऱ्यापासून घोडावाल्यापर्यंत जुळवाजुळवयंदा जूनपर्यंतच जवळपास लग्नाचे ५० पेक्षा जास्त मुहूर्त असले तरी लग्न सोहळ्याची संख्यादेखील जास्त राहणार आहे. घरातील मंगल कार्यालयाच्या वेळी लागणारे आचारी, केटरर्स,लग्नपत्रिका, घोडेवाला,बँड, इव्हेंट मॅनेजमेंट सेवेदारांशी संपर्क करून आवश्यक ती जुळवाजुळव करण्यावर भर दिला जात आहे.

यावर्षी दसऱ्यापासूनच सोने गत काही महिन्यांच्या तुलनेत स्वस्त होते. तसेच दिवाळीनंतर सोने महाग होईल की काय अशी शक्यता असल्याने अनेकांनी पितृपक्ष, दसरा-दिवाळीपूर्वीच सोने खरेदी केली आहे. त्यामुळे मुहूर्ताच्या खरेदीसोबतच लग्नासाठी आवश्यक दागिन्यांची खरेदी केली आहे.

टॅग्स :marriageलग्न