बालविकास मंच सदस्यांसाठी रविवारी चित्रकला स्पर्धा

By admin | Published: August 29, 2014 01:03 AM2014-08-29T01:03:16+5:302014-08-29T01:34:02+5:30

अहमदनगर : लोकमत बालविकास मंच व रचना कला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने वर्धापन दिनानिमित्त विशेष चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे

Painting Competition on Sunday for Child Development Forum members | बालविकास मंच सदस्यांसाठी रविवारी चित्रकला स्पर्धा

बालविकास मंच सदस्यांसाठी रविवारी चित्रकला स्पर्धा

Next


अहमदनगर : लोकमत बालविकास मंच व रचना कला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने वर्धापन दिनानिमित्त विशेष चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. ३१ आॅगस्ट २०१४ रोजी सकाळी ९ वाजता दादा चौधरी विद्यालय, कोर्टगल्ली, अहमदनगर येथे होणार आहे.
स्पर्धेचे गट पुढीलप्रमाणे- गट १ : बालवाडी, गट २ : इ. पहिली ते दुसरी, गट ३ : तिसरी ते चौथी, गट ४ : इ.पाचवी ते सहावी, गट ५ : इ. सातवी ते आठवी, गट ६ : इ. नववी ते दहावी, गट ७ : मुकबधीर व मतिमंद, अपंग.
स्पर्धेचे नियम व अटी- स्पर्धेसाठी फक्त कागद देण्यात येईल. इतर साहित्य विद्यार्थ्यांनी स्वत: आणावे, विषय स्पर्धेच्या ठिकाणी देण्यात येईल. सहभागी स्पर्धकाला प्रमाणपत्र देण्यात येईल. स्पर्धेसाठी गट क्र.१ ते ७ प्रवेश फी रु. ५ असणार आहे. इच्छूक विद्यार्थ्यांनी प्रवेश फी शनिवार, दि. ३० आॅगस्ट २०१४ सायं. ५ वा.पर्यंत महाविद्यालयात किंवा लोकमत भवन, सावेडी रोड, अहमदनगर येथे जमा करावी. अधिक माहितीसाठी रचना कला महाविद्यालय, सांगळेगल्ली. फोन- ०२४१-२३४५८८१ किंवा लोकमत भवन, पत्रकार चौक, सावेडी, फोन- ०२४१-२४२९९०२ येथे संपर्क साधावा. (प्रतिनिधी)

Web Title: Painting Competition on Sunday for Child Development Forum members

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.