मुळा धरणावर पावसाची विश्रांती; नदीपात्रातून आवक सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2019 11:51 AM2019-09-28T11:51:13+5:302019-09-28T11:51:33+5:30

गेल्या दोन दिवसांपासून मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पावसाने विश्रांती घेतली आहे़ त्यामुळे धरणाकडे होणारी पाण्याची आवक १५०० क्युसेकवर खाली घसरली आहे़ धरणाच्या दोन्ही कालव्यातून पाण्याचे आवर्तन सुरू आहे़

Rainfall rest on radish dam; Incoming from the river | मुळा धरणावर पावसाची विश्रांती; नदीपात्रातून आवक सुरूच

मुळा धरणावर पावसाची विश्रांती; नदीपात्रातून आवक सुरूच

Next

राहुरी : गेल्या दोन दिवसांपासून मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पावसाने विश्रांती घेतली आहे़ त्यामुळे धरणाकडे होणारी पाण्याची आवक १५०० क्युसेकवर खाली घसरली आहे़ धरणाच्या दोन्ही कालव्यातून पाण्याचे आवर्तन सुरू आहे़
२६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणातील पाणीसाठा २५ हजार ७४० दशलक्ष घनफुटावर स्थिरावला आहे़  धरणात पाण्याची पातळी १ हजार ८११़५५ फुटावर आहे़ मुळा धरण ९८़९९ टक्के भरले आहे़ सध्याचा पाणीसाठा स्थिर ठेऊन दोन्ही कालवे व मुळा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे़ उपयुक्त पाणीसाठा २१२३८ दशलक्ष घनफूट इतका आहे़ गेल्या वर्षी मुळा धरणात २४ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठा जमा झाला होता़  याशिवाय १९०० दशलक्ष घनफूट पाणी जायकवाडीला सोडण्यात आले होते़
गेल्या वर्षी मुळा धरणातून शेतीसाठी दोन आवर्तन मिळाले होते़ नदीपात्रातील बंधाºयामध्ये पाणी शिल्लक न राहिल्याने मुळा काठाला हादरा बसला होता़  यंदा दोन्ही कालव्यातून चार आवर्तन मिळणार आहेत़ नदीपात्रातून ३ हजार ७०० दशलक्ष घनफूट पाणी वाहून गेले आहे़ डाव्या कालव्यातून ४० क्युसेकने शेतीसाठी आवर्तन सुरू आहे़ उजव्या कालव्यातून ७०० क्युसेकने पाण्याचे शेतीसाठी आवर्तन सुरू आहे.
आतापर्यंत मुळानगर येथे ४३० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे़ मुळानगर परिसरातही गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे़ कोतूळ येथे यंदाच्या पावसाळ्यात ८४४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे़ मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर पावसाने सरासरी ओलांडली आहे़ गेल्या दोन दिवसांपासून पाणलोट क्षेत्रावर पावसाने चांगलीच उघडीप दिली आहे. मुळा धरणाच्या लाभ क्षेत्रावर पावसाने विश्रांती घेतल्यामुळे दोन्ही कालव्याव्दारे शेतीसाठी ऐन पावसाळ्यात आवर्तन सुरू आहे़ शेतकºयांचे लक्ष आभाळाकडे वेधले आहे़ पोळ्यानंतर रब्बीच्या पेरण्यांना वेग येतो़ मात्र सध्या रब्बीच्या पेरण्यांना वेग नाही.
मुळा धरणाच्या डाव्या कालव्यातून ४० क्युसेकने शेतीसाठी पाण्याचे आवर्तन सुरू आहे़ पाण्याचा विसर्ग वाढविण्याची शेतक-यांनी मागणी केलेली नाही़ त्यामुळे डाव्या कालव्यातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला नाही़ शेतकºयांनी मागणी केल्यास विसर्ग वाढविला जाईल़, असे मुळा धरण अभियंता रवींद्र आंधळे यांनी सांगितले.

Web Title: Rainfall rest on radish dam; Incoming from the river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.