सहा वर्षात तीनशे वेळा शिर्डीची वारी, सत्तावीस वेळेस रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2016 02:07 PM2016-07-17T14:07:32+5:302016-07-17T14:07:32+5:30

शिवप्रिया पुण्याच्या टाटा वाहन उद्योगात संशोधन विभागात व्यवस्थापक पदावर आहे़ केवळ साईदर्शनासाठी पुण्यात नोकरी करणाऱ्या शिवप्रियाने सप्टेंबर २००९ पासुन पुण्यात नसतांनाचे अपवाद वगळता

Shirdi Vrishi, three times a year, blood donation twenty-seven times in six years | सहा वर्षात तीनशे वेळा शिर्डीची वारी, सत्तावीस वेळेस रक्तदान

सहा वर्षात तीनशे वेळा शिर्डीची वारी, सत्तावीस वेळेस रक्तदान

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत
शिर्डी, दि. १७ : मुळची चेन्नईची व सध्या पुण्यात वास्तव्यास असलेली शिवप्रिया आपल्या आगळ्यावेगळ्या भक्तीने साईप्रिया बनली आहे़
शिवप्रिया पुण्याच्या टाटा वाहन उद्योगात संशोधन विभागात व्यवस्थापक पदावर आहे़ केवळ साईदर्शनासाठी पुण्यात नोकरी करणाऱ्या शिवप्रियाने सप्टेंबर २००९ पासुन पुण्यात नसतांनाचे अपवाद वगळता प्रत्येक आठवड्याला साईदरबारी हजेरी लावली आहे़ गेल्याच आठवड्यात तीच्या तब्बल तीनशे वाऱ्या पुर्ण झाल्या़ विशेष म्हणजे प्रत्येक तीन महिन्यातुन एकदा ती साईदरबारी रक्तदानही करत असते़ या माध्यमातुन तीने आजवर सत्तावीस वेळेस रक्तदान केले आहे़
 

तीनशे वाऱ्याचे औचित्य साधुन तीने गेल्या आठवड्यात तीनशे भाविकांना शिऱ्याचा नास्ता दिला तर आज संस्थान रूग्णालयाला दोन हिमोग्लोबीन अनालायझर व आठ रक्तदाब तपासणी यंत्र भेट दिले़ संस्थान रक्तपेढीचे डॉ़ सुर्यकांत पाटील यांनी ही देणगी स्विकारली़ यावेळी विठ्ठल शिरसाठ,अजित क्षिरसागर,सुनिल कर्जुले,अशोक सातभाई, गंगाधर घारे,सुनिल निकम,कांचन इल्हे,सौरभ मेढे,निलेश मोरे व संस्थानचे पुजारी बाळासाहेब जोशी उपस्थीत होते़
 

गेल्या सहा महिन्यापुर्वीही जवळपास एक लक्ष रूपये किमतीचे इसीजी मशिनही तीने साईनाथ रूग्णालयाला अर्पण केले होते़ प्रत्येक आठवड्याला येणारी शिवप्रिया त्या दिवशी साईबाबांच्या हारांसाठी बाजारातुन फुले खरेदी करून संस्थानच्या हार बनवणारया विभागाला देत असते़ गेल्या तीन वर्षांपासुन ती संस्थानच्या सुरक्षा विभागातील सर्व महिला कर्मचाऱ्यांना दिवाळीला प्रत्येकी दोन साड्या भेट देत असते़ यंदा तीन येथील द्वारकामाई वृद्धाश्रमातील सर्व एकशे पाच वृद्धांना कपडे तसेच सर्व कर्मचाऱ्यांना गणवेश भेट दिले होते़ लक्ष्मीवाडी येथील शाळेसाठीही तीने खोल्या बांधण्यासाठी आर्थिक मदत केली होती़ आयुष्यात साईबाबांना सर्वस्व मानणाऱ्या शिवप्रियाला शिर्डीकर होण्याची व आपला अंत येथेच व्हावा अशी आंतरीक इच्छा आहे़. 

Web Title: Shirdi Vrishi, three times a year, blood donation twenty-seven times in six years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.