श्रीगोंद्यात संताप

By Admin | Published: July 18, 2016 11:46 PM2016-07-18T23:46:20+5:302016-07-19T00:08:50+5:30

श्रीगोंदा / काष्टी : कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना कडक शिक्षा करावी, या मागणीसाठी सोमवारी श्रीगोंदा तालुक्यात ठिकठिकाणी बंद, निषेध सभा, रास्ता रोको करण्यात आले़

Shri grievances | श्रीगोंद्यात संताप

श्रीगोंद्यात संताप

googlenewsNext

श्रीगोंदा / काष्टी : कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपींना कडक शिक्षा करावी, या मागणीसाठी सोमवारी श्रीगोंदा तालुक्यात ठिकठिकाणी बंद, निषेध सभा, रास्ता रोको करण्यात आले़ संतप्त भावना व्यक्त करताना अनेकांनी कायदा व सुव्यवस्था ढासळल्यामुळे असे अत्याचार घडत असल्याची संतप्त भावना व्यक्त केली़
कोपर्डी येथील दुर्दैवी घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी सोमवारी काष्टी, आढळगाव, लोणीव्यंकनाथ, घारगाव, तांदळी येथे कडकडीत बंद पाळण्यात आला़ मढेवडगाव येथे एक तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले़ यावेळी तरूणाईने आपल्या तीव्र भावना व्यक्त करताना दोषी नराधमांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे, अशी मागणी केली़
काष्टी येथील बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला़ विद्यार्थी व ग्रामस्थांनी गावातून मूक फेरी काढली़ भैरवनाथ चौकात निषेध सभा झाली़ या सभेत अरुणराव पाचपुते, प्रतिभा पाचपुते, सुवर्णा पाचपुते, रफीक इनामदार, दिलीप दरेकर, मदन गडदे, ज्ञानदेव पाचपुते यांची भाषणे झाली़
मढेवडगाव ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी तासभर नगर-दौंड रोडवर रास्ता रोको आंदोलन केले़ यावेळी सुवर्णा पाचपुते, फुलसिंग मांडे, अनिता शिंदे, सुजाता शिंदे, संतोष गुंड, हनुमंत झिटे, भैय्या वाबळे, गोरख उंडे, भाऊसाहेब मांडे यांची भाषणे झाली. यावेळी पोलिस निरीक्षक साहेबराव कडनोर यांना निवेदन दिले़
आढळगाव येथील तरूणाईने कोपर्डी प्रकरणावर चांगलीच आक्रमक भूमिका घेतली़ एक हाक देताच पूर्ण बाजारपेठ बंद झाली़ निषेध सभेत देवराव वाकडे, शरद जमदाडे, बंटी उबाळे आदींची भाषणे झाली़
लोणीव्यंकनाथमध्ये सोमवारी कडकडीत बंद पाळण्यात आला़ यावेळी तरूणाईने कोपर्डी घटनेच्या विरोधात नारेबाजी करून मनातील आक्रोश व्यक्त केला़
घारगाव येथील तरूण कार्यकर्त्यांनी घारगाव बंदचे आवाहन केले़ त्यावर व्यापारी बांधवांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला़ यावेळी भूषण बडवे, पांडुरंग पानसरे, देविदास थिटे, धनंजय पवार, रोशन निंभोरे यांची भाषणे झाली़ (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Shri grievances

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.