शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोण मायचा लाल माझं रेकॉर्ड मोडू शकत नाही", अजित पवार चंदगडमध्ये काय बोलले?
2
राहुलबाबाला MSP चा फुल फॉर्म; खरीफ-रबी पिकातील फरक माहितेय का? शाहांची बोचरी टीका
3
तरणाबांड भारत हळूहळू वार्धक्याकडे जाऊ लागला! सरासरी वय २४ वरून २९ वर
4
बंदुकीचा धाक दाखवून चप्पल चाटायला लावले, टाचेखाली चिरडले, ४ जणांकडून अल्पवयीनाचं लैंगिक शोषण
5
पुणे: वाडिया कॉलेजमध्ये प्राध्यापकाच्या मुलीवर सामुहिक अत्याचार; उप जिल्हाधिकाऱ्याच्या मुलाचा धंगेकरांनी केला उल्लेख
6
आमदार सुमन पाटील, रोहित पाटलांचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या; प्रकरण काय?
7
Solar Eclipse 2024: सूर्यग्रहणाचा कसा आणि कोणावर होणार परिणाम? कोणती पथ्य पाळावी? वाचा!
8
सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; रिलायन्सच्या तेजीमुळे मार्केट कॅप विक्रमी उच्चांकावर; या सेक्टरचे भाव वधारले
9
सायबर अटॅक! हॅकर्सनी १९ रेल्वे स्टेशनच्या Wi-Fi नेटवर्कला केलं टार्गेट; करू नका 'ही' चूक
10
"भारतातच मुलांचं चांगलं भविष्य", दिल्लीत स्थायिक झालेल्या अमेरिकन महिलेनं कारणंच सांगितली...
11
"पुरुषांच्या तुलनेत महिलांना इस्लाम स्वीकारायला लावणे सोपे", झाकीर नाईकच्या मुलाचा खळबळजनक खुलासा!
12
"भाजपाचा एक खासदार संसदेत असेपर्यंत...", अमित शाहांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
13
बांगलादेशची पॉर्नस्टार रिया बर्डे ठाण्याची रहिवाशी कशी बनली? Inside Story
14
IND vs BAN, 2nd Test Day 1 : पावसाची बॅटिंग अन् उशीरा सुरु झालेला सामना वेळेआधीच थांबला!
15
बहिणींची भावाला मिठी, आत्याने घेतला मुका! सूरजच्या कुटुंबाचं प्रेम बघून सर्वांचे डोळे पाणावले, नवा प्रोमो बघाच
16
रील बनवण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांच्या लेकाची जीपस्वारी, पोलिसांची उडाली धावपळ, व्हिडीओ व्हायरल 
17
"खबरदार, लाडक्या बहिणींच्या पैशांकडे नजर ठेवली तर..."; देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना इशारा
18
Gold Silver Rates : विक्रमी तेजीवरून सोनं घसरलं, चांदीही झाली १७६४ रुपयांनी स्वस्त; पाहा सोन्या-चांदीचे लेटेस्ट रेट्स
19
"हेल्मेट से LBW ले सकते है"; विकेटमागून पंतची 'कॉमेंट्री'
20
"मला लढायचंच...!"; अजितदादांच्या आमदाराची भाजपविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची घोषणा

मिरजगावात रास्ता रोको

By admin | Published: July 18, 2016 11:52 PM

कोपर्डी अत्याचार प्रकरणातील उर्वरित आरोपींचा तातडीने शोध घ्यावा, या मागणीसाठी मिरजगाव (ता. कर्जत) येथे सोमवारी रास्ता रोको करण्यात आला.

मिरजगाव : कर्जत तालुक्यातील शाळा महाविद्यालयांच्या परिसरातील टगेगिरीला तातडीने आळा घालण्याच्या मागणीसाठी तसेच कोपर्डी अत्याचार प्रकरणातील उर्वरित आरोपींचा तातडीने शोध घ्यावा, या मागणीसाठी मिरजगाव (ता. कर्जत) येथे सोमवारी रास्ता रोको करण्यात आला.कोकणगाव-ज्योतिबावाडी येथील ग्रामस्थांनी नगर-सोलापूर हा राज्यमार्ग तासभर रोखला. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. तालुक्यामध्ये आजही मोठ्या प्रमाणात मुलींची छेडछाड होत आहे. अब्रूला घाबरून पालक तक्रार करीत नाहीत. त्यामुळे शाळा महाविद्यालयांच्या परिसरात गस्त ठेवावी, अशी मागणी गुलाब तनपुरे यांनी केली. यावेळी मराठा महासंघाचे अध्यक्ष गंगाधर बोरूडे, कोकणगावचे सरपंच अभंग बोरूडे, संभाजी काळगे, हरिदास के दारी, संदीप खराडे, रामा तनपुरे यांची भाषणे झाली. ग्रामपंचायत सदस्य मोहन गवारे, पंडा बोरूडे, संजय मापारी, महादेव गवारे, तात्यासाहेब गवारे, शहाजी करपे, कल्याण गवारे, गणेश चव्हाण, पंढरीनाथ गवारे, बिभिषण सूर्यवंशी, संदीप बोरूडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते. (वार्ताहर)पारनेरमध्ये मूकमोर्चा, निषेधसभापारनेर : कोपर्डी अत्याचारप्रकरणी पारनेर शहरात सोमवारी महात्मा फुले पुतळ्यासमोर मूक धरणे आंदोलन करून घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. विविध राजकीय व सामाजिक संघटनांच्यावतीने निषेध सभाही घेण्यात आल्या.अ‍ॅड.गणेश कावरे, महेश गायकवाड, सेनेचे शहरप्रमुख निलेश खोडदे यांच्या पुढाकाराने सकाळी महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर आंदोलनास प्रारंभ झाला. यावेळी आमदार विजय औटी, बाजार समितीचे माजी सभापती काशीनाथ दाते,पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके यांच्यासह सेनेचे शहरप्रमुख निलेश खोडदे, गणेश कावरे, महेश गायकवाड, नागेश्वर मित्र मंडळाचे अध्यक्ष डॉ.नरेंद्र मुळे, किरण शिंदे, समीर कार्ले, धीरज महांडुळे, गोरख औटी, संजय देशमुख, गौरव भालेकर, दत्तात्रय अंबुले, बबन चौरे, शाहीर गायकवाड, डॉ.सादीक राजे, सतिष म्हस्के, राजेंद्र म्हस्के, संदीप खेडेकर, भाऊ खेडेकर आदींसह युवक मोठ्या संख्येने हजर होते. मूक आंदोलनानंतर तहसीलदार भारती सागरे,पोलीस निरीक्षक दिलीप पारेकर यांना निवेदन देण्यात आले. पारनेर तालुका राष्ट्रवादीच्यावतीनेही घटनेचा निषेध केला.यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुजित झावरे,दीपक नाईक,योगेश मते आदी हजर होते.पारनेर तालुका काँग्रेसच्यावतीने जिल्हा उपाध्यक्ष राहुल झावरे,तालुकाध्यक्ष डॉ.भास्कर शिरोळे आदींच्या उपस्थितीत निषेध करण्यात आला. बहुजन मुक्ती पक्षाच्यावतीने जिल्हाध्यक्ष राजेंद्र करंदीकर,आयुब शेख,अविनाश देशमुख,रिपब्लिकनचे तालुकाध्यक्ष अमित जाधव,गणेश उबाळे,प्रवीण पाडळे,शरद मोरे,निखिल गायकवाड आदींनी तहसीलदारांना निवेदन देऊन गुन्हेगारांवर कारवाई करण्याची मागणी केली. (तालुका प्रतिनिधी)शेवगावात कडकडीत बंदशेवगाव : कोपर्डी घटनेच्या निषेधार्थ विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्या वतीने सोमवारी शेवगाव शहरात कडकडीत बंद पुकारण्यात आला. क्रांती चौकातील निषेध सभेत विविध वक्त्यांनी या संतापजनक प्रकाराचा तीव्र शब्दात निषेध नोंदवून गुन्हेगारांना फासावर लटकावून अशा घटनांना कायमस्वरुपी पायबंद घालण्यासाठी कठोर कायदा करण्याची मागणी केली.सोमवारी सकाळी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी शहरात फेरी काढून व्यावसायिकांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. त्यानुसार सर्व व्यवहार दिवसभर बंद ठेवून नागरिकांनी आंदोलनात सहभाग दर्शविला. क्रांती चौकात झालेल्या निषेध सभेत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते काकासाहेब नरवडे, युवकचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, तालुकाध्यक्ष कल्याण नेमाने, केदारेश्वरचे संचालक माधव काटे, अजिंक्य लांडे, एजाज काझी, कृष्णा ढोरकुले, कमलेश लांडगे, भाजपचे ज्येष्ठ नेते अ‍ॅड.शिवाजी काकडे, शहराध्यक्ष रवींद्र सुरवसे, सुनील रासने, नगरसेवक कमलेश गांधी, वजीर पठाण, मनसेचे गणेश रांधवणे, काँग्रेसचे प्रकाश तुजारे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका कार्याध्यक्ष रवींद्र सर्जे, शहराध्यक्ष दत्तात्रय फुंदे, दारूबंदी समितीचे अमोल घोलप, कृष्णा नेमाने, कॉ.संजय नांगरे आदींसह शिवसेना, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, राजमुद्रा ग्रुप, जयस्तु मराठा, युवा मंथन, जाणता राजा मंडळ, शिवराज्य मंडळ, आॅल इंडिया युथ फेडरेशन, ईदगाह मैदान ग्रुप आदी संघटनांच्या प्रतिनिधींनी आपले मनोगत व्यक्त केले. पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी आंदोलकांशी संवाद साधताना पोलीस प्रशासनाने सर्व आरोपींना अटक केलेली आहे. शासनाने सदर खटला जलदगती न्यायालयात चालविण्याचे मान्य करून सरकारची बाजू मांडण्यासाठी प्रख्यात विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नेमणूक केली असल्याचे स्पष्ट केले. याच घटनेसंदर्भात येथील आबासाहेब काकडे उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मूक मोर्चा काढून निषेध नोंदविला. (तालुका प्रतिनिधी)जामखेड तालुक्यात पडसाद सुरूचजामखेड : कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या केल्याच्या निषेधार्थ जामखेड तालुक्यात सहा दिवस उलटूनही याचे तीव्र पडसाद उमटत आहेत.सोमवारी तालुक्यातील विविध संघटनांनी व राजकीय पक्षांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन या घटनेचा निषेध व्यक्त केला.तहसीलदार सुशील बेल्हेकर यांना विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राष्ट्रवादी काँग्रेस व मनसे यांच्या वतीने निवेदने देण्यात आली. यावेळी बजरंग दलाचे अध्यक्ष आकाश पिंपळे, विश्व हिंदू परिषद नगर प्रमुख डिगांबर राळेभात, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष दतात्रय वारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र कोठारी,नगराध्यक्ष प्रीती राळेभात, महिला अध्यक्षा शारदा भोरे, जिल्हा सरचिटणीस संजय वराट, नगरसेविका विद्या वाव्हळ, राजेंद्र गोरे, अमोल गिरमे,विकास राळेभात, प्रकाश काळे, युवक अध्यक्ष अ‍ॅड. मयुर डोके, मनसे तालुका अध्यक्ष प्रदीप टापरे, सरपंच दादा सरनोबत, मनसे जिल्हा उपाध्यक्ष वैभव जामकावळे, तालुका उपाध्यक्ष सनी सदाफुले, शहर अध्यक्ष बालाजी भोसले, रवी कांबळे, सागर गायकवाड यांच्यासह अनेकांनी निवेदन देऊन या घटनेचा निषेध व्यक्त केला. विद्यार्थ्यांनी वाहिली श्रद्धांजलीकाष्टी : कर्जत तालुक्यातील कोपर्डी अत्याचार प्रकरणाचा काष्टी (ता. श्रीगोंदा ) येथील परिक्रमा शैक्षणिक संकुलात निषेध करण्यात आला. विद्यार्थ्यांनी मृत अल्पवयीन विद्यार्थिनीला श्रद्धांजली वाहिली़परिक्रमाच्या अध्यक्षा प्रतिभा पाचपुते म्हणाल्या की, कोपडीर्ची घडलेली घटना ही अतिशय निंदनीय आहे. संतांचा विचारांचा वारसा असलेल्या महाराष्ट्रात अशी घटना घडते ही लाजीरवाणी बाब आहे. विद्यार्थी प्रतिनिधी विशाल कवडे, विनय भोसले, अविनाश हराळ, गौरव गिरमकर, राहुल शिंदे, आरती शिंदे, वैशाली गायकवाड, प्रीती नलगे, राणी काळाणे यांनी निवेदन दिले. परिक्रमाचे संचालक डॉ. एस.एस.शायले, शासकीय आधिकारी प्रा.सागर कदम,प्राचार्य डॉ.जाधवर, प्राचार्य मोहन धगाटे ,प्रा.महाडीक, प्रा.गुणवरे ,खेडकर,अवधूत राऊत, विद्यार्थी व सर्व कर्मचारी हजर होते. विद्यार्थ्यांनी या घटनेतील मृत विद्यार्थिनीला श्रद्धांजली वाहिली़(वार्ताहर)पाथर्डीत महिला आक्रमकपाथर्डी : कोपर्डी अत्याचार प्रकरणाचा निषेध तसेच पोलीस खात्याने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात या मागणीसाठी सोमवारी दुपारी संघर्ष महिला ग्रुपच्या अध्यक्षा भारती असलकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करीत तहसीलदारांना निवेदन दिले. भारती असलकर,सिंधू पांडकर, उज्ज्वला सरोदे, सुनीता उदबत्ते, अनिता काटकर, सुरेखा टिपरे, सुजाता लोटके, स्वाती मार्तडे, अश्विनी इधाटे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने तहसील कार्यालयात जमा झाल्या. भारती असलकर म्हणाल्या, कोपर्डी येथील घटना नगर जिल्ह्याला नव्हे तर पुरोगामी महाराष्ट्राला बदनाम करणारी असून मानवतेला काळीमा फासणारी आहे.पोलिसांचा वचक नसल्यामुळे हे सर्व प्रकार घडत आहे.पोलीस प्रशासनाने अशा घटना घडणार नाहीत याबाबत काळजी घेण्यासाठी आम्ही महिला हे आंदोलन करीत आहोत.पैसा आणि पुढाऱ्यांच्या वरदहस्तामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे. याचा विचार पोलीस प्रशासनाने करावा व महिलांना सुरक्षित जगता येईल याची काळजी घ्यावी़ यावेळी संघर्ष महिला ग्रुप ,हिरकणी लोकसंचलित साधन केंद्र व चौंडेश्वरी महिला मंडळाच्या सभासदांनी तहसीलदार सुनीता जऱ्हाड यांना निवेदन दिले. त्यावर सुमारे शंभर महिलांच्या सह्या आहेत.