राहात्यात कांदा उत्पादकांचा रास्ता रोको

By admin | Published: July 23, 2016 12:03 AM2016-07-23T00:03:32+5:302016-07-23T00:13:44+5:30

राहाता : राहाता बाजार समितीत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी आणला होता़ परंतु कांद्याला मिळणाऱ्या भावामुळे उत्पादन खर्चही निघू शकत नसल्याने शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले़

Stop the way of growing onion growers | राहात्यात कांदा उत्पादकांचा रास्ता रोको

राहात्यात कांदा उत्पादकांचा रास्ता रोको

Next

राहाता : राहाता बाजार समितीत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी आणला होता़ परंतु कांद्याला मिळणाऱ्या भावामुळे उत्पादन खर्चही निघू शकत नसल्याने शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले़ नगर- मनमाड महामार्गावर तब्बल तीन तास आंदोलन केल्याने वाहतूक दुतर्फा खोळंबली होती़
लासलगाव, येवला यासह राज्यातील अनेक बाजार समित्या बंद असताना शेतकऱ्यांना आपला माल विकता यावा या करीता राहाता येथील कांदा मार्के ट सुरु ठेवले आहे़ यामुळे नेहमी ३० हजार गोण्यांची आवक असलेल्या राहाता बाजार समितीत नाशिक, वैजापूरसह नगर जिल्ह्यातील इतर ठिकाणच्या ६० हजार पेक्षा जास्त कांदा गोण्यांची आवक शुक्रवारी झाली होती़ सकाळी लिलाव सुरु झाल्यानंतर चारशे ते आठशे रुपये प्रति क्विंटल भाव निघाल्याने शेतकऱ्यांनी विरोध केला़ बारा वाजता नगर-मनमाड महामार्गावर रास्ता रोको सुरु केले़
बाजार समितीच्या वतीने सभापती भाऊसाहेब आहेर, सचिव उध्दव देवकर यांनी शेतकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र शेतकरी ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते़ लिलाव झालेल्या भावात वाढ करा, या मागणीवर अडून बसले होते़ घटनेची माहिती मिळताच राहाता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास पवार आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले़ मात्र शेतकऱ्यांचा मोठा जमाव पाहता त्यांनी शिर्डी व लोणी येथील बंदोबस्त बोलावून घेतला़ बाजार समितीच्या अधिकाऱ्यांसोबत शेतकऱ्यांना समजविण्याचा प्रयत्न केला़ मात्र भाव वाढवून मिळावा या करीता शेतकऱ्यांनी रास्ता रोको करीत तीन तास आंदोलन केले़ नगर-मनमाड महामार्गावर दोन्ही बाजूला सात ते आठ किलोमीटर पर्यंत वाहनाच्या रांगा लागल्याने साईभक्तांसह प्रवाशांना मोठे हाल सहन करावे लागले़
(वार्ताहर)

Web Title: Stop the way of growing onion growers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.