भिंत कोसळून चिमुकल्याचा बळी

By admin | Published: July 27, 2016 12:11 AM2016-07-27T00:11:49+5:302016-07-27T00:42:01+5:30

जामखेड : सलून दुकानात कटींग सुरू असतानाच लोणी येथे शेजारील भिंत कोसळून झालेल्या दुर्दैवी घटनेत सार्थक अजिनाथ परकड (वय ४ वर्ष) या चिमुकल्याचा बळी गेला.

Wall of wall collapsing | भिंत कोसळून चिमुकल्याचा बळी

भिंत कोसळून चिमुकल्याचा बळी

Next


जामखेड : सलून दुकानात कटींग सुरू असतानाच लोणी येथे शेजारील भिंत कोसळून झालेल्या दुर्दैवी घटनेत सार्थक अजिनाथ परकड (वय ४ वर्ष) या चिमुकल्याचा बळी गेला. अन्य चार जण जखमी झाले. यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला नगरला हलविण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामखेड तालुक्यातील लोणी येथे सार्थक परकड हा चिमुकला आपल्या चुलत्यांबरोबर कटींग करण्यासाठी आला होता. यावेळी दुकानात चार ते पाच लोकही बसले होते. जवळच दहा वर्षांपूर्वी ग्रामपंचायत हद्दीतील गाळे काढण्यासाठी अर्धवट असलेल्या विटांच्या भिंती बांधण्यात आल्या होत्या. निकृष्ट दर्जाचे गाळ्याचे बांधकाम रखडलेले होते. त्यातच सध्या दोन- तीन दिवसांपासून मूर पाऊस होत असल्याने या भिंतीमध्ये पाणी गेले होते.
शेजारीच उघड्यावर सार्थक याची सलूनचालक कटींग करीत होता. कटींग सुरू असतानाच सकाळी ८ वाजेच्या सुमारास शेजारील भिंत सार्थक याच्या डोक्यावर पडल्याने तो जबर जखमी होऊन जागीच ठार झाला. तर बाजूला बसलेले अरुण अजिनाथ शेंडकर (वय ४०), अंकुश बाबासाहेब पवार (वय २४) सुदामती मोहन बुजबळ (वय ३५), दत्ता मोहन बुजबळ (वय ३५, सर्व राहणार लोणी, ता. जामखेड) हे चार जण जखमी झाले.
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Wall of wall collapsing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.