‘शिंदे साहेबांना सांगाल काय? शाळाबंदी करू नका!’ संगमनेरात १०० बसेसला लावले पोस्टर

By शेखर पानसरे | Published: October 8, 2022 04:23 PM2022-10-08T16:23:54+5:302022-10-08T16:26:14+5:30

Eknath Shinde: ‘शिंदे साहेबांना सांगाल काय? शाळाबंदी करू नका!’ ‘सरकारी शाळा आमच्या हक्काच्या नाही कुणाच्या मालकीच्या’, ‘मराठी शाळा वाचल्याच पाहिजे’ असे पोस्टर सुमारे १०० बसेसला लावण्यात आले.

Will you tell Mr. Eknath Shinde? Don't ban schools!' posters put on 100 buses in Sangamnera | ‘शिंदे साहेबांना सांगाल काय? शाळाबंदी करू नका!’ संगमनेरात १०० बसेसला लावले पोस्टर

‘शिंदे साहेबांना सांगाल काय? शाळाबंदी करू नका!’ संगमनेरात १०० बसेसला लावले पोस्टर

googlenewsNext

- शेखर पानसरे
 संगमनेर : ‘शिंदे साहेबांना सांगाल काय? शाळाबंदी करू नका!’ ‘सरकारी शाळा आमच्या हक्काच्या नाही कुणाच्या मालकीच्या’, ‘मराठी शाळा वाचल्याच पाहिजे’ असे पोस्टर सुमारे १०० बसेसला लावण्यात आले. राज्यात वीस पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्या निर्णयाला विरोध करण्यासाठी छात्रभारती विद्यार्थी संघटनेने शनिवारी (दि.८) संगमनेर बसस्थानकात बसेसला पोस्टर लावले. 
 संघटनेचे राज्य कार्यवाह अनिकेत घुले, माजी प्रदेशाध्यक्ष दत्ता ढगे, प्रदेश कार्यकारणीचे सदस्य गणेश जोंधळे, जिल्हाध्यक्ष राहुल जऱ्हाड, तुषार पानसरे आदी यावेळी उपस्थित होते. संगमनेर बसस्थानकातील तसेच संगमनेर बसस्थानकात येणाऱ्या इतरही आगारांच्या बसेसला पोस्टर लावण्यात आले.

Web Title: Will you tell Mr. Eknath Shinde? Don't ban schools!' posters put on 100 buses in Sangamnera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.