तुम्हीच सांगा, आम्ही शाळेला जायचं कसं?

By admin | Published: July 18, 2016 11:47 PM2016-07-18T23:47:45+5:302016-07-19T00:09:48+5:30

नेवासा : मुलींना शाळेला जाताना रोडरोमिओंच्या अंगात सैतान संचारतो, मग तुम्हीच सांगा आम्ही शाळेत जायचं कसं, असा उद्विग्न सवाल नेवासा शहरातील मुलींनी उपस्थित केला़

You say, how do we go to school? | तुम्हीच सांगा, आम्ही शाळेला जायचं कसं?

तुम्हीच सांगा, आम्ही शाळेला जायचं कसं?

Next

नेवासा : मुलींना शाळेला जाताना चौका-चौकात, नाक्या-नाक्यावर उभे असलेल्या रोडरोमिओंच्या अंगात सैतान संचारतो, मग तुम्हीच सांगा आम्ही शाळेत जायचं कसं, असा उद्विग्न सवाल नेवासा शहरातील मुलींनी सोमवारी उपस्थित केला़ कोपर्डी येथे अल्पवयीन शाळकरी मुलीवर अत्याचार करुन निर्घृन खून केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ या मुली रस्त्यावर उतरल्या होत्या़
सोमवारी नेवासा, नेवासाफाटासह तालुक्यात विविध ठिकाणी बंद, मोर्चा काढून ‘कोपर्डी’ घटनेचा निषेध नोंदविला़ महिला बचतगट चळवळीच्या नेत्या सुनिता शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला़ गडाख म्हणाल्या, कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार व निर्घून खून ही मानवतेला काळीमा फासणारी घटना असून आरोपींना कठोर शासन करण्यात यावे, सध्याच्या काळात महिलांची सुरक्षीतता धोक्यात आलेली असल्याने त्यांच्या सुरक्षततेसाठी कठोर पावले उचलावे, असे सांगितले़
महिला राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षा विशाखा बेल्हेकर, व्दारका कुमावत, ज्योती घोलप, शुभांगी बडे, मन्नाबी शेख यांनी या घटनेचा तिव्र शब्दात निषेध केला. या खटल्याचा निकाल जलद लावावा, महिलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे़ अशा घटना टाळण्यासाठी भविष्यात महिलांनाच सक्षम व्हावे लागणार आहे, त्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहान गडाख यांनी केले. आंदोलानानंतर पोलीस निरीक्षक संपत शिंदे, नायब तहलिसदार जे़ व्ही़ जायकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद गोर्डे यांनी निवेदन स्विकारले. यावेळी वैशाली गडाख, राजश्री गडाख, सोनईच्या उपसरपंच पुष्पा चांदघोडे, शुभांगी बडे, नेवाशाच्या सरपंच कांता गायके, विद्या दरंदले, प्रतिभा चौधरी, सुशिला लोखंडे, उषा गडाख, शर्मीला शिंदे, सीमा गायके, अंबिका इरले, सविता राऊत, माधुरी जामदार, आशा वाखुरे, योगीता केंदळे, अंजली शिंदे, अर्चना गायकवाड, अंजली पटारे, संध्या जाधव, गायत्री जंगम, शोभा डोखळे, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र उंदरे, अ‍ॅड़ कारभारी वाखुरे, सुनील जाधव, वैभव नवथर, दादा गंडाळ, राहुल देहडराय, अनिल लहारे, राहुल राजळे, बाळासाहेब कोकणे, सुनिल धायजे, शिवा गवळी, अश्विनी फिरोदिया आदी उपस्थीत होते़ नेवासा शहरातील सुंदरबाई कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनीही तहसील कार्यालयावर मोर्चा काढला़
विद्यार्थिनींचा संताप
४कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीच्या अत्याचारासारख्या घटना आमच्यावर ओढावणार असतील तर आम्ही शाळेत कसं जायचं, असा सवाल या विद्यार्थिनींनी यावेळी उपस्थित केला़ यावेळी विद्यार्थिंनींच्या बोलण्यात संताप जाणवत होता़
पाथर्डी शहरात कडकडीत बंद
पाथर्डी : कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या नराधमांना तत्काळ फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी सर्वपक्षीयांच्या वतीने सोमवारी पाथर्डी शहर बंद ठेवण्यात आले. बंदला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.
सोमवारी सकाळी सर्वपक्षीय कार्यकर्ते आंबेडकर चौकापासून मुख्य रस्त्याने नाईक चौकात आले. व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपली दुकाने बंद ठेवली होती. नाईक चौकात राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब ताठे,भाजपचे ज्येष्ठ नेते अशोक गर्जे, माजी नगरसेवक बंडू बोरूडे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष सीताराम बोरूडे, संभाजी ब्रिगेडचे नाशिक विभागीय उपाध्यक्ष सुनील कदम, महेश बोरूडे, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते, नागरिक जमा झाले़ याच ठिकाणी निषेध सभा घेण्यात आली.
अशोक गर्जे म्हणाले, कोपर्डी येथील घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. गुन्हेगारांना जात नसते़ गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो़ त्यामुळे या प्रकरणातील गुन्हेगारांना कडक शासन होवून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा.
माजी नगरसेवक बंडू बोरूडे म्हणाले, कोपर्डी घटनेने जिल्ह्याची मान खाली गेली आहे. शासनाने तातडीने आरोपींना अटक करून त्यांचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा. पोलीस खात्याने यापुढे सतर्क राहून अशा घटना घडणार नाहीत याची काळजी घ्यावी. सध्या जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे़
दुपारपर्यंत शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला़ दुपारनंतर हा बंद मागे घेण्यात आला़ त्यामुळे दुपारनंतर सर्व व्यवहार सुरळीत झाले होते़
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: You say, how do we go to school?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.