अकोला : लॉकडाऊनंतर मीटर रीडिंगप्रमाणे दिलेले तीन महिन्यांचे एकत्रित वीज बिल अचूक असल्याबाबत अकोला परिमंडळातील ग्राहकांना मेळावे, वेबिनार, मोबाइल व प्रत्यक्ष संवादाद्वारे माहिती दिली जात आहे. या माध्यमातून देण्यात येणाºया वीज बिलाच्या विश्लेषणावर ग्राहक समाधानी असून, ३० जूनपर्यंत १ लाख ७५ हजारांपेपक्षा जास्त लघुदाब ग्राहकांनी त्यांच्या ४२ कोटी ६८ लाख रुपयांच्या वीज बिलाचा भरणा केला आहे. उर्वरित ग्राहकांनीही आपले वीज बिल भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणअकोला परिमंडळाच्यावतीने करण्यात येत आहे.राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी तीन महिन्यांचे एकत्रित वीज बिल एकरकमी भरणाºया ग्राहकांना वीज बिलात दोन टक्के सूट व मागणी करणाºया ग्राहकांना वीज बिलाचे तीन हप्ते करून देण्यात येणार असल्याचे घोषित केले आहे. अकोला परिमंडळात गेल्या १५ दिवसांपासून १६९ शाखा कार्यालये, ३१ उपविभाग, ७ विभाग, ३ जिल्हा कार्यालय आणि परिमंडळ कार्यालयात १ असे एकूण २१० ग्राहक मदत कक्ष स्थापन करून ग्राहकांच्या तक्रारींचे निरसन करण्यात येत आहे. तसेच ग्राहक शिबिरे, वेबिनारचे आयोजन करून वीज बिलाचे विश्लेषण समजून सांगण्यात येत आहे. याशिवाय ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाइलवर संपर्क, ‘एसएमएस’, व्हॉट्स अॅप मेसेज पाठवून बिलासंदर्भात माहिती देण्यात येत आहे. जनजागृती मोहिमेला प्रतिसाद देत व वीज बिलाच्या विश्लेषणावर समाधान व्यक्त करत जून अखेरपर्यंत १ लाख ७५ हजार १९७ ग्राहकांनी त्यांचे ४२ कोटी ६८ लाख रुपयांचे वीज बिल भरले आहे.तीन समान हप्त्यात भरता येणार बिलऊजामंत्री डॉ. राऊत यांनी जाहीर केल्याप्रमाणे या ग्राहकांना दोन टक्के सवलतीचा लाभ चालू महिन्याच्या बिलात मिळेल. तसेच ग्राहकांना वीज बिलाचे तीन सामान हप्ते करून वीज बिल भरता येणार आहेत. या सुविधांचा लाभ घेऊन उर्वरित ग्राहकांनी आपले वीज बिल भरून कठीण आर्थिक परिस्थितीत महावितरणला सहकार्य करण्याची गरज आहे. असे आवाहनही अकोला परिमंडळाकडून करण्यात येत आहे.