१0 शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना यवतमाळची आर्ट संस्था करणार मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 09:27 PM2017-12-19T21:27:12+5:302017-12-19T21:50:28+5:30

तेल्हारा : आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात देण्यासाठी यवतमाळच्या आर्ट संस्थेने पुढाकार घेऊन वर्षभर राशन पुरविण्याची जबाबदारी घेतली आहे.

10 farmers help the suicidal families to do Yavatmal arts institutes | १0 शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना यवतमाळची आर्ट संस्था करणार मदत

१0 शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना यवतमाळची आर्ट संस्था करणार मदत

googlenewsNext
ठळक मुद्देआत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना मदतीचा हातवर्षभर राशन पुरवठा करण्याची घेतली जबाबदारी

लोकमत न्यूज नेटवर्क
तेल्हारा : आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात देण्यासाठी यवतमाळच्या आर्ट संस्थेने पुढाकार घेऊन वर्षभर राशन पुरविण्याची जबाबदारी घेतली आहे. तालुक्यातील तळेगाव बाजार येथील डॉ. सतीष खारोडे व मित्रमंडळाने १८ डिसेंबर रोजी संयुक्तरित्या आयोजीत केलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पोलीस पाटील जनार्दन खारोडे हे होते. प्रमुख अतिथी म्हणून नायब तहसीलदार व्ही.टी. चव्हाण, माजी सरपंच मधुकरराव राऊत, नवनिर्वाचीत सरपंच राम खारोडे, सुरेश मानखैर हे होते.
 या वेळी तालुक्यातील प्रकाश गुजर, रमाबाई खराटे, सुरेश अवचार, कैलास भोंडे, अकील खा, जयप्रकाश खारोडे, वंदना बोदळे, मानिकराव कराळे, अंबादास सोळंके, माणीकराव चोपडे  इत्यादींच्या कुटुंबियांना वर्षभराचे राशन पुरविण्याची जबाबदारी आर्ट संस्था यवतमाळ व केअरींग फ्रेन्डस मुंबई यांनी स्वीकारली आहे. यावेळी या कार्यक्रमाला रावसाहेब खारोडे, रामकिरण खारोडे, गुणवंत खारोडे, सदानंद खारोडे, उद्धव मानखैर, बासू अरबट, रफीकभाई,  वाहेदभाई, संतोष भड, राजकुमार खारोडे, दीपक खारोडे, अरुण खारोडे, बंडू राऊत, जगदीश खारोडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन ग्रा.पं. सदस्य शे. मुजफर यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रवीण खारोडे यांनी केले.

Web Title: 10 farmers help the suicidal families to do Yavatmal arts institutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.