अकोला: अकोला तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात काल रात्रीपासून पावसाची संततधार सुरू असून संपूर्ण जिल्ह्यात ३० ऑक्टोबरपर्यंत अलर्ट जिल्हा प्रशासन तसेच आपत्ती नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्यातर्फे जाहीर करण्यात आला आहे.
अकोला जिल्ह्यातील सर्वच प्रकल्प शंभर टक्के भरले असून बहुतांश प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. अकोला तालुक्यातील जिल्ह्यातील सर्वात मोठे प्रकल्प म्हणून ओळख असलेल्या काटेपूर्णा प्रकल्प प्रकल्पामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. काटेपूर्णा प्रकल्पाच्या कॅच मेंट भागात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्यामुळे आज काटेपूर्णा प्रकल्पाचे १० वक्र द्वार उघडण्यात आले असून पाण्याचा विसर्ग १५३.४९ घ.मी./से. वरून वाढवून २५५.८३९ घ.मी./से. पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पाची आज १० वक्र द्वारा प्रत्येकी ३०cm नि उघडण्यात आले असून काटेपूर्णा नदीकाठच्या सर्व गावांना सतर्क राहण्याचा इशारा सुद्धा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.