अकोटात १०० क्विंटल भुईशेंग जप्त
By admin | Published: June 1, 2017 02:11 AM2017-06-01T02:11:02+5:302017-06-01T02:11:02+5:30
खासगी जिनिंगवर धाड : अकोट बाजार समितीची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोट : अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भुईमूग शेंगाची खरेदी व हर्रासी न करता मोहाळा येथील खासगी जे.पी. जिनिंग फॅक्टरीमध्ये सुरू असलेल्या भुईमूग खरेदीवर अकोट बाजार समितीच्या वतीने ३१ मे रोजी धाड टाकण्यात आली. यावेळी १०० क्ंिवटल भुईशेंग शेंगा जप्त करण्यात आल्या.
मागील काही दिवसांपासून भुईशेंगांना योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी, व्यापारी व बाजार समितीत बिनसले आहे. अशातच मोहाळा येथील जिनिंगमध्ये पल्ली काट्यावर भुईमूग शेंगांची खरेदी व हर्रासी सुरू असल्याच्या माहितीवरून बाजार समितीचे सचिव राजकुमार माळवे यांनी या ठिकाणी खरेदी अवैध खरेदीबाबत विचारणा सुरू केली. यावेळी अकोट ग्रामीणचे ठाणेदार पी.जे. अब्दागिरे तेथे पोहोचले. शेतकरी, व्यापारी, उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यात थोडीफार बाचाबाची झाली. त्यानंतर ही अवैधरीत्या खरेदी व हर्रासी असल्याने १०० क्विंटल भुईमूग शेंगा बाजार समितीने जप्त केल्याची माहिती सचिव माळवे यांनी दिली.