मध्य प्रदेशातील १०८६ मजूर विशेष रेल्वेने जबलपूरकडे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 10:16 AM2020-05-08T10:16:07+5:302020-05-08T10:16:40+5:30

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी अकोला रेल्वे स्टेशन येथे हिरवा कंदील दाखवून ही गाडी रवाना केली.

1086 laborers from Madhya Pradesh left for Jabalpur by special train | मध्य प्रदेशातील १०८६ मजूर विशेष रेल्वेने जबलपूरकडे रवाना

मध्य प्रदेशातील १०८६ मजूर विशेष रेल्वेने जबलपूरकडे रवाना

Next

अकोला : अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम व बुलडाणा या जिल्ह्यांतील १,०८६ स्थलांतरित श्रमिक मजूर गुरुवारी विशेष रेल्वेगाडीने अकोला येथून जबलपूरकडे रवाना झाले. आज रात्री ८ वाजता जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी अकोला रेल्वे स्टेशन येथे हिरवा कंदील दाखवून ही गाडी रवाना केली.
यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्यासमवेत पोलीस अधीक्षक अमोघ गावकर, अमरावती येथील उपायुक्त प्रमोद देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार, उपजिल्हाधिकारी रोहयो बाबासाहेब गाढवे, तहसीलदार विजय लोखंडे, रेल्वेचे मुख्य वाणिज्य निरीक्षक अकोला मो. यस्मिन अन्सारी उपस्थित होते. यावेळी विशेष श्रमिक एक्स्प्रेस गाडी न ०१९२० या गाडीने हे श्रमिक रवाना झाले. त्यात अकोला जिल्ह्यातील १६०, अमरावती जिल्ह्यातील ३३६, वाशिम जिल्ह्यातील ४४, बुलडाणा जिल्ह्यातील २४३ व यवतमाळ येथील ३०३ प्रवासी होते. या सर्व प्रवाशांना प्रशासनातर्फे जेवण, पाणी पुरविण्यात आले.
शुक्रवार, ८ मे रोजी अकोला ते भोपाल या मार्गावर दुसरी श्रमिक रेल्वे जाणार असून, ही गाडी अकोला येथून रात्री ८.३० वाजता रवाना होणार आहे. या गाडीतही अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलडाणा व वाशिम येथील परप्रांतीय श्रमिकांचा समावेश असेल, असे नोडल अधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी कळविले आहे.

 

Web Title: 1086 laborers from Madhya Pradesh left for Jabalpur by special train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.