पातुरातील १२ जण वाशिमच्या कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2020 10:21 AM2020-04-04T10:21:49+5:302020-04-04T10:22:09+5:30
मूळ गावी परतण्यापूर्वी पातूर तालुक्यातील काही लोकांच्या संपर्कात आल्याची माहिती शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली.
अकोला : वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील कोरोनाचा बाधित रुग्ण पातूर येथील १२ जणांच्या संपर्कात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे बाराही जण अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात दाखल होणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
प्राप्त माहितीनुसार, वाशिम जिल्ह्यातील कोरोनाचा बाधित रुग्ण हा दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमातून परतला होता. शुक्रवारी त्याचे वैद्यकीय चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान, तो त्याच्या मूळ गावी परतण्यापूर्वी पातूर तालुक्यातील काही लोकांच्या संपर्कात आल्याची माहिती शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली. यातील १२ जणांनी आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधला आहे. या सर्वांना अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात दाखल करण्यात येणार असून, त्यांचे ‘स्वॅब’ शनिवारी सकाळीच नागपूर येथे पाठविण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली. हा प्रकार अकोलेकरांसाठी धोक्याची घंटा असून, नागरिकांनी आवश्यक खबरदारी घेण्याची आता खरी गजर निर्माण झाली आहे.
समूह संक्रमणाचा धोका वाढला!
जिल्ह्यात आतापर्यंत एकही कोरोनाचा बाधित रुग्ण आढळला नाही; परंतु वाशिम येथील एका बाधित रुग्णाच्या संपर्कात १२ जण आल्याने जिल्ह्यात समूह संक्रमणाचा धोका वाढला आहे. या १२ जणांपैकी एकाचाही वैद्यकीय चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यास प्रशासनाची चिंता वाढणार आहे. शिवाय, हे १२ जण आणखी किती लोकांच्या संपर्कात आले आहेत, याचा तपास लावणे आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान आहे.
अकोलेकरांची खरी परीक्षा आता!
अकोलेकर आता खºया अर्थाने कोरोनाच्या तिसºया पायरीच्या उंबरठ्यावर असून, नागरिकांसाठी ही मोठी परीक्षा ठरणार आहे. त्यामुळे आता विनाकारण घराबाहेर निघणे टाळणेच योग्य ठरणार असून, नागरिकांनी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाय करण्याची गरज आहे