१२०० कोरकू मजूर ‘लॉकडाउन’मुळे मेळघाटातच! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 02:28 PM2020-04-18T14:28:42+5:302020-04-18T14:29:12+5:30

२१ मार्चपासून ‘लॉकडाउन’ झाल्याने हे मजूर अकोल्यात आले नाहीत.

१२०० Korku laborers stay in Melghat due to lockdown | १२०० कोरकू मजूर ‘लॉकडाउन’मुळे मेळघाटातच! 

१२०० कोरकू मजूर ‘लॉकडाउन’मुळे मेळघाटातच! 

googlenewsNext

- संजय खांडेकर  
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: अकोला एमआयडीसीत काम करणारे १२०० कोरकू मजूर ‘लॉकडाउन’मुळे मेळघाटातील त्यांच्या गावीच अडकले आहेत. हे सर्व मजूर होळीसाठी मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच गावाकडे गेले होते. दरम्यान, २१ मार्चपासून ‘लॉकडाउन’ झाल्याने हे मजूर अकोल्यात आले नाहीत. जे काही आले ते फारच कमी असून, त्यांच्या भरवशावर अकोल्यातील २० टक्के उद्योग सुरू झाले आहेत.
अकोला एमआयडीसीत डाळ आणि आॅइल मिल्सची संख्या इतर उद्योगांच्या तुलनेत जास्त आहे. दोन्ही उद्योग जीवनावश्यक बाबींमध्ये येत असल्याने जिल्हा प्रशासनाने या उद्योगांना सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे; मात्र हे उद्योग सुरू करताना मजूर वर्गाची समस्या भेडसावित आहे. एमआयडीसीतील दोन्ही उद्योगांमध्ये ७० टक्के मजूर आदिवासी कोरकू आहेत. अमरावतीच्या जंगल परिसरात राहणाºया या समाजाला रोजगार नसल्याने हा मोठा वर्ग अकोल्यात येतो. 
१५०० च्या घरात कोरकू मजूर एमआयडीसीत कामाला असतो. संपूर्ण कुटुंब वर्षभर एकत्र राहतात. ९ आणि १० मार्च रोजी असलेल्या होळी सणानिमित्त हे सर्व मजूर वर्ग महिन्याच्या सुरुवातीलाच मेळघाटातील गावाकडे गेले होते. कोरोना महामारीचा प्रकोप सुरू झाल्याने २१ मार्चपासून राज्यात ‘लॉकडाउन’ झाले. त्यामुळे अकोल्यात येणारे १२०० कोरकू मजूर सुदैवाने मेळघाटातच राहिले. 
जे काही ३०० मजूर अकोल्यात आले आहेत, त्याच्या आणि स्थानिक काही मजुरांच्या भरवशावर अकोल्यातील २० टक्के उद्योग सुरू झाले आहेत. 
अकोल्यातून तूर डाळ, चणा डाळ आणि तेल मोठ्या प्रमाणात बाहेर पाठविल्या जात आहे.

परप्रांतातील लोक अकोला एमआयडीसीत फार कमी आहेत. मध्य प्रदेश आणि काही उत्तर प्रदेशचे लोक यामध्ये आहे. इतर सर्व ट्रक चालक-वाहक आहेत. उद्योजकांच्या गोदामामध्ये आणि खोल्यांमध्येच समूहाने राहणाºयांची व्यवस्था आहे. कोरोनासारखी लक्षणे दिसताच आम्ही आरोग्य अधिकाºयांना पाचारण करतो.
-रामेश्वर चव्हाण, 
निरीक्षक, एमआयडीसी अकोला.


दाल मिल, आॅइलसारखे जीवनावश्यक वस्तूंमधील उद्योग सुरू आहेत. स्थानिक आणि काही मेळघाटातील मजूर या ठिकाणी आहे. ‘सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटाझरच्या वापरासंदर्भात त्यांना सांगितले जाते. कोरोनासारखी लक्षणे
दिसताच आरोग्य विभागातील अधिकाºयांना येथे पाचारण केले जाते.
-उन्मेश मालू, 
अध्यक्ष, एमआयडीसी अकोला.

Web Title: १२०० Korku laborers stay in Melghat due to lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.