अकोला : गतवर्षी जून ते आॅगस्ट या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकांच्या नुकसानापोटी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यास १० जुलै रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त १३ हजार ५४९ शेतकºयांना पीक नुकसान भरपाईची मदत मिळणार आहे.राज्यात गत जून ते आॅगस्ट २०१८ या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसान भरपाईपोटी बाधित शेतकºयांना मदत वाटप करण्यासाठी १३९ कोटी १९ लाख १८ हजार रुपयांची रक्कम वितरित करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचा निर्णय १० जुलै २०१९ रोजी शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत काढण्यात आला. त्यानुसार गतवर्षी अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या शेतकºयांना पीक नुकसानाची मदत मिळणार आहे. गतवर्षी जून ते आॅगस्ट या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे अकोला जिल्ह्यात २९८ गावे बाधित झाली होती. त्यामध्ये अकोला, तेल्हारा, बाळापूर, पातूर, बार्शीटाकळी व मूर्तिजापूर या सहा तालुक्यांमध्ये १३ हजार ५४९ शेतकºयांचे ७ हजार ७७२६ हेक्टर ४९ आर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. जिल्ह्यातील पीक नुकसान भरपाईपोटी ५ कोटी ५१ लाख ८८ हजार रुपयांच्या मदतनिधीची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ३१ आॅक्टोबर २०१८ रोजी शासनाकडे करण्यात आली होती. अतिवृष्टीमुळे पीक नुकसान भरपाईपोटी बाधित शेतकºयांना मदत वाटपासाठी रक्कम वितरित करण्यास शासनामार्फत मान्यता देण्यात आल्याने, जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त १३ हजार ५४९ शेतकºयांना पीक नुकसान भरपाईची मदत वाटप करण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत ५ कोटी ५१ लाख रुपयांचा मदत निधी प्राप्त होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकºयांना लवकरच पीक नुकसान भरपाईची मदत मिळणार आहे.अतिवृष्टीग्रस्त शेतकरी आणि पीक नुकसानाचे असे आहे क्षेत्र!तालुका शेतकरी क्षेत्र (हेक्टर)अकोला ३०३१ १९७३.७८तेल्हारा ५६६ १८५.००बाळापूर २७८० १५६३.५५पातूर १०० ३०.२०बार्शीटाकळी २३४५ ७०१.४६मूर्तिजापूर ४७२७ ३२७२.४३..............................................................एकूण १३५४९ ७७२६.४९वर्षभरानंतर मदत मंजूर!गतवर्षीच्या जून ते आॅगस्ट या कालावधीत अतिवृष्टीमुळे शेती पिकांच्या नुकसान भरपाईपोटी शेतकºयांना मदत वाटप करण्यासाठी १० जुलै रोजीच्या शासन निर्णयानुसार मदतनिधी वितरणास मंजुरी देण्यात आली. त्यानुषंगाने वर्षभरानंतर अतिवृष्टीग्रस्त शेतकºयांना मदत मंजूर करण्यात आली आहे.