अकोला : गतवर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यात पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांपैकी पीक कर्जाची परतफेड न केलेल्या आणि कर्जाचे पुनर्गठनही करण्यात आले नसल्याने जिल्ह्यातील थकबाकीदार १३ हजार ८०३ शेतकºयांना यंदाच्या खरीप हंगामासाठी अद्यापही नवीन पीक कर्ज मिळाले नाही.यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील १ लाख ४२ हजार ५०० शेतकºयांना पीक कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट जिल्हा प्रशासनामार्फत निश्चित करण्यात आले आहे. उद्दिष्टाच्या तुलनेत ११ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील १ लाख १ हजार २७४ शेतकºयांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. ३० सप्टेंबरपर्यंत खरीप पीक कर्जाचे वाटप करण्यात येणार आहे. दरम्यान, गतवर्षीच्या (२०१९-२०) खरीप हंगामात जिल्ह्यातील ५२ हजार १६७ शेतकºयांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आले होते. त्यापैकी कर्जाची परतफेत केलेल्या ३८ हजार ३६४ शेतकºयांना यावर्षीच्या खरीप हंगामासाठी बँकांकडून पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे; परंतु घेतलेल्या पीक कर्जाची परफेड न केलेल्या आणि कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले नसल्याने, जिल्ह्यातील थकबाकीदार १३ हजार ८०३ शेतकºयांना यंदाच्या खरीप हंगामात अद्यापही नवीन पीक कर्ज मिळाले नाही. गतवर्षीचे पीक कर्ज थकीत असल्याने आणि पीक कर्जाचे पुनर्गठनही करण्यात आले नसल्याने, जिल्ह्यातील संबंधित थकबाकीदार शेतकºयांना यंदाच्या खरीप हंगामात नवीन पीक कर्जाच्या लाभापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे गतवर्षीच्या पीक कर्जाचे पुनर्गठन केव्हा होणार आणि नवीन पीक कर्ज केव्हा मिळणार, यासंदर्भात थकबाकीदार शेतकºयांकडून प्रतीक्षा केली जात आहे.गतवर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील ५२ हजार १६७ शेतकºयांना पीक कर्जाचे वाटप करण्यात आले होते. त्यापैकी कर्जाच्या रकमेचा भरणा केलेल्या ३८ हजार ३६४ शेतकºयांना यावर्षीच्या खरीप हंगामात नवीन पीक कर्जाचा लाभ देण्यात आला आहे. उर्वरित १३ हजार ८०३ शेतकºयांनी पीक कर्जाची परतफेड केली नाही आणि कर्जाचे पुनर्गठनही करण्यात आले नसल्याने, त्यांना यंदाच्या खरीप हंगामात नवीन पीक कर्ज वाटप करण्यात आले नाही.- आलोक तारेणियाव्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक
थकबाकीदार १३,८०३ शेतकऱ्यांना मिळेना नवीन पीक कर्ज!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 10:42 AM