अकोला  जिल्ह्यात सात ठिकाणी १४ कोविड केअर सेंटर; ११,५० खाटांची व्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2020 11:17 AM2020-04-14T11:17:00+5:302020-04-14T11:17:07+5:30

१४ कोविड केअर सेंटर स्थापन करण्यात आले असून, त्यातून १,१५० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे.

14 Covid Care Centers in Akola district; An arrangement of 1150 beds | अकोला  जिल्ह्यात सात ठिकाणी १४ कोविड केअर सेंटर; ११,५० खाटांची व्यवस्था

अकोला  जिल्ह्यात सात ठिकाणी १४ कोविड केअर सेंटर; ११,५० खाटांची व्यवस्था

Next

अकोला : कोरोना प्रादुर्भावाच्या पृष्ठभूमीवर संदिग्ध रुग्ण वा कोविड पॉझिटिव्ह रुग्णांच्या थेट संपर्कातील व्यक्तींच्या तपासणीनंतर त्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरही संबंधित व्यक्तींना किमान १४ दिवस निरीक्षणात व अलगीकरण करून ठेवणे गरजेचे असते. त्यासाठी तालुकास्तरावर व अकोला शहरात असे मिळून सात ठिकाणी १४ कोविड केअर सेंटर स्थापन करण्यात आले असून, त्यातून १,१५० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. या संदर्भात समन्वय अधिकारी व वैद्यकीय समन्वय अधिकारी यांच्याही नियुक्त्या करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिला आहे.
अकोलातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील कृषक भवन (८० खाटा), कृषी यांत्रिकी भवन (२० शिवनेरी वसतिगृह (१४०) आहेत. या तीनही सेंटरचे वैद्यकीय समन्वय अधिकारी डॉ. मधुकर राठोड हे असून, समन्वय अधिकारी अकोल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार हे आहेत. अकोटमध्ये आयटीआय वसतिगृह, अकोट (४०) गजानन महाराज विहीर संस्थान अकोली, जहागीर (४०) या दोनही सेंटरसाठी वैद्यकीय समन्वय अधिकारी डॉ. एस.बी. तोरणेकर हे असून, समन्वय अधिकारी अकोटचे उपविभागीय अधिकारी रामदास सिद्धभट्टी हे आहेत. तेल्हाऱ्यात विपश्यना केंद्र खापरखडा (६०), तहसील नवीन इमारत (४०), नगर परिषद सभागृह (४०) या तीनही सेंटरसाठी वैद्यकीय समन्वय अधिकारी डॉ. तापडिया व डॉ. प्रवीण चव्हाण हे असून, समन्वय अधिकारी जिल्हा पुनर्वसन अधिकारी सदाशिव शेलार हे आहेत. बाळापुरातील मुलींची निवासी शाळा शेळद (२००) वैद्यकीय समन्वय अधिकारी डॉ. भावना हाडोळे, समन्वय अधिकारी उपविभागीय अधिकारी बाळापूर रमेश पवार हे असतील तर पातूर डॉ. ढोणे डब्ल्यूएस कॉलेज, पातूर (१५०) वैद्यकीय समन्वय अधिकारी डॉ. विजय जाधव, समन्वय अधिकारी महसूल उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे यांच्यावर जबाबदारी आहे. मूर्तिजापुरात शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज (१८) समाज कल्याण इमारत (७०) या दोन्ही सेंटरसाठी डॉ. एम.डी. राठोड हे वैद्यकीय समन्वय अधिकारी आहेत, तर उपविभागीय अधिकारी मूर्तिजापूर अभयसिंह मोहिते हे समन्वय अधिकारी आहेत. बार्शीटाकळी ग्रामीण रुग्णालयाचे निवासस्थान (५०) समाजकल्याण वसतिगृह (४०) या दोन्ही सेंटरचे वैद्यकीय समन्वय अधिकारी डॉ. मनीष शर्मा आहेत तर समन्वय अधिकारी रोहयो उपजिल्हाधिकारी डॉ. बाबासाहेब गाढवे हे आहेत.
या सर्व सेंटर्स मिळून १,१५० खाटांची व्यवस्था करण्यात आली असून, या ठिकाणी आरोग्यविषयक, भोजन, चहापान तसेच सुरक्षा व्यवस्था व स्वच्छता, पाणीपुरवठा आदींबाबत व्यवस्था ठेवण्याबाबत संबंधित यंत्रणांना निर्देशित करण्यात आले आहे.

 

Web Title: 14 Covid Care Centers in Akola district; An arrangement of 1150 beds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.