प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याने १८ रेल्वेगाड्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 09:41 AM2021-05-10T09:41:10+5:302021-05-10T09:41:20+5:30

Indian Railway News : . प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याने १८ रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत.

18 trains canceled due to lack of response from passengers | प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याने १८ रेल्वेगाड्या रद्द

प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याने १८ रेल्वेगाड्या रद्द

Next

अकोला : कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. याचा परिणाम रेल्वेच्या वाहतुकीवरही झाला आहे. मोठ्या प्रमाणात प्रवाशांची आरक्षण रद्द केले. बहुतांश नागरिक प्रवास टाळत आहे. प्रवाशांचा प्रतिसाद नसल्याने १८ रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कठाेर निर्बंध लागू करण्यात आले आहे. अकाेल्यासह अनेक जिल्ह्यांमध्ये तर कडक टाळेबंदीही जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना अत्यावश्यक कामांव्यतिरिक्त इतर कामांसाठी घराबाहेर पडण्यास निर्बंध लावण्यात आले आहेत. परिणामी,,अनेक नागरिकांनी त्यांचा बाहेरील जिल्ह्यातील पर्यटनासाठीचा प्रवास रद्द केला आहे. रेल्वेगाड्यांमधील आरक्षणही रद्द करण्यात आले आहे.

या गाड्या रद्द

प्रवाशांच्या कमी प्रतिसादामुळे रेल्वे प्रशासनाने १८ रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत. यात गाडी क्रमांक ०२११३ पुणे-नागपूर विशेष ही गाडी ३० जूनपर्यंत आणि गाडी क्रमांक ०२११४ नागपूर-पुणे विशेष गाडी २९ जून रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक ०२१८९ मुंबई-नागपूर विशेष गाडी १ जुलैपर्यंत आणि गाडी क्रमांक ०२१९० नागपूर-मुंबई विशेष ३० जूनपर्यंत. गाडी क्रमांक ०२१११ मुंबई-अमरावती विशेष गाडी १ जुलैपर्यंत आणि गाडी क्रमांक ०२११२ अमरावती-मुंबई विशेष गाडी ३० जूनपर्यंत, गाडी क्रमांक ०२०४१ पुणे-नागपूर विशेष गाडी २४ जूनपर्यंत आणि गाडी क्रमांक ०२०४२ नागपूर-पुणे विशेष २५ जूनपर्यंत रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक ०२०३६ नागपूर-पुणे विशेष गाडी ३० जून आणि गाडी क्रमांक ०२०३५ पुणे-नागपूर विशेष १ जुलैपर्यंत, गाडी क्रमांक ०२११७ पुणे-अमरावती विशेष गाडी ३० जूनपर्यंत आणि गाडी क्रमांक ०२११८ अमरावती-पुणे विशेष गाडी १ जुलैपर्यंत रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक ०२२२३ पुणे-अजनी विशेष २ जुलैपर्यंत आणि गाडी क्रमांक ०२२२४ अजनी-पुणे विशेष २९ जूनपर्यंत, गाडी क्रमांक ०२२३९ पुणे-अजनी विशेष गाडी २६ जूनपर्यंत आणि गाडी क्रमांक ०२२४० अजनी-पुणे विशेष २७ जूनपर्यंत, गाडी क्रमांक ०१४०४ कोल्हापूर-नागपूर विशेष गाडी २८ जूनपर्यंत आणि गाडी क्रमांक ०१४०३ नागपूर-कोल्हापूर विशेष गाडी २९ जूनपर्यंत. गाडी क्रमांक ०११३७ नागपूर-अहमदबाद विशेष गाडी ३० जूनपर्यंत आणि ०११३८ अहमदाबाद-नागपूर विशेष १ जुलैपर्यंत रद्द करण्यात आली आहे.

Web Title: 18 trains canceled due to lack of response from passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.