शेतकरी आत्महत्यांची १९ प्रकरणे मदतीसाठी पात्र!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:19 AM2021-05-20T04:19:06+5:302021-05-20T04:19:06+5:30

फेरचौकशीचे निर्देश अकोला : शेतकरी आत्महत्या प्रकरणांत तातडीने मदत देण्यासंदर्भात बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीच्या सभेत जिल्ह्यातील ...

19 cases of farmer suicides eligible for help! | शेतकरी आत्महत्यांची १९ प्रकरणे मदतीसाठी पात्र!

शेतकरी आत्महत्यांची १९ प्रकरणे मदतीसाठी पात्र!

Next

फेरचौकशीचे निर्देश

अकोला : शेतकरी आत्महत्या प्रकरणांत तातडीने मदत देण्यासंदर्भात बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीच्या सभेत जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्यांची १९ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली. सात प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आली असून, एका प्रकरणात फेरचौकशीचे निर्देश देण्यात आले आहेत.

जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील २८ शेतकरी आत्महत्या प्रकरणांवर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये दादाराव बापूराव भांडे (म्हातोडी), माणिकराव बापूराव देशमुख (माझोड), सुनील नानाराव भगत (नागठाणा), संजय रामराव मडावी (किन्ही ), दिलीप गोपाल साबळे (बेलुरा), संतोष नामदेव इंगळे (आलेगाव), अशोक रघुजी उपर्वट (देऊळगाव), मारोती तुळशीराम चिंचोळकर (भोकर), नागोराव महादेव तायडे (भोकर), भीमराव तुळशीराम तायडे (मिलिंद नगर तेल्हारा), राजेश शेषराव वानखडे (सांगवी खुर्द), कुणाल प्रकाश देशमुख (भोड), काजूसिंग गुलाब चव्हाण (साखरविरा), प्रभू बाबूसिंग पवार (साखरविरा), सत्यपाल मनोहर रणगिरे (अकोली जहागीर), नीलेश नरसिंग इंगळे (उमरा), नंदा कैलास बुंधे (उमरा), लीला सीताराम वसतकार (भंडारज) व संदीप प्रल्हाद डेरे (एदलापूर) इत्यादी १९ शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरविण्यात आली. उर्वरित सात शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आली असून, एक शेतकरी आत्महत्या प्रकरणात फेरचौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले, तर एक प्रकरण प्रलंबित ठेवण्यात आले. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा परिषद कृषी सभापती पंजाबराव वडाळ, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आलोक तारेनिया आदी संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Web Title: 19 cases of farmer suicides eligible for help!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.