अकोला : माळी समाजाचे २४ वे राज्यस्तरीय परिचय महासम्मेलनाचा संत नगरी शेगांव येथे शनिवार दि. १३ रोजी प्रारंभ होणार आहे. ४० हजार स्क्वेअर फुटाच्या भव्य मंडपात हे संमेलन होत आहे. संमेलन शेगांव येथील माळी समाज बहुउद्देशीय मंडळ, युग पुरुष महात्मा फुले प्रतिष्ठान, माळी सेवा मंडळ खामगांव यांच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे. प्रमुख मार्गदर्शक माजी आ. लक्ष्मणराव तायडे, माजी आ. कृष्णराव इंगळे, यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे. दोन दिवसीय सम्मेलनाला विविध क्षेत्रातील मान्यवरांसह देशभरातून २० हजारापेक्षा जास्त समाज बांधव उपस्थित राहणार आहे.संमेलनाचे उदघाटन शनिवार, जानेवारी रोजी खा. राजीव सातव यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी माजी आ.लक्ष्मणराव तायडे तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आ.कृष्णराव इंगळे, आ.योगेश टिळेकर, आ.बळीराम सिरस्कार, माजी मंत्री सुधाकरराव गणगणे, वैधानिक विकास मंडळाचे माजी अध्यक्ष तुकाराम बिरकड, माजी आ.जगन्नाथ ढोणे यांच्यासह राजकीय, औद्योगिक व सामाजिक क्षेत्रातील गणमान्य मंडळीची उपस्थिती यावेळी राहणार आहे. यावेळी समाजोपयोगी वेबसाईडचे उद्घाटन व सोयर पुस्तिकेचे विमोचन खा.राजीव सातव यांच्या हस्ते पार पडेल.संमेलनाचे उत्कृष्ट नियोजन व सम्मेलन चांगल्या रितीने पार पाडण्यासाठी अध्यक्ष प्रल्हादराव सातव, कार्याध्यक्ष सुरेश गिºहे, उध्दवराव बोळे, डॉ.शंकरराव क्षीरसागर, डी.एस. खंडारे, प्रल्हादराव बगाडे, डॉ.तानकर, प्रा.हरिभाऊ इंगळे, श्रीकृष्ण बोळे, कमल तावडे, आदींच्या मार्गदर्शनात बंडूभाऊ इंगळे, प्रा.दिनेश तायडे, संजय वानखडे, अनिल गिºहे, नितीन इंगळे, राजेश तायडे, रमेश हिवराळे, प्रदिप सातव, अजय तायडे, ज्ञानदेवराव बोदडे, रामेश्वर वावगे, नामदेवराव बहादरे, राजेन्द्र भोपळे, तुकाराम निखाडे, विजय राखोंडे, उल्हास क्षीरसागर, अॅड.श्रीकांत तायडे, प्रकाश कापुरे, विठ्ठल ढगे, गोपाल तायडे, गुलाबराव गिºहे, विनोद इंगळे, जयेश वावगे, महादेव खंडारे, वासुदेव तावडे, वनिता उंबरकर, विनायक जुमळे, अविनाश उंबरकर, गजानन राऊत, सुशिल इंगळे यांच्यासह विविध समाजिक मंडळ व कार्यरत समित्या अथक परिश्रम करीत आहेत. वेळ, श्रम, पैसा वाचविणाºया, ऋणानुबंध घडवून आणणाºया या संमेलनास सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजन समितीने केले आहे.
माळी समाजाचे २४ वे राज्यस्तरीय संमेलन १३ व १४ जानेवारीला शेगावात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 5:49 PM
अकोला : माळी समाजाचे २४ वे राज्यस्तरीय परिचय महासम्मेलनाचा संत नगरी शेगांव येथे शनिवार दि. १३ रोजी प्रारंभ होणार आहे. ४० हजार स्क्वेअर फुटाच्या भव्य मंडपात हे संमेलन होत आहे.
ठळक मुद्देराज्यस्तरीय परिचय महासम्मेलनाचा संत नगरी शेगांव येथे शनिवार दि. १३ रोजी प्रारंभ होणार आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांसह देशभरातून २० हजारापेक्षा जास्त समाज बांधव उपस्थित राहणार आहे.माळी समाज बहुउद्देशीय मंडळ, युग पुरुष महात्मा फुले प्रतिष्ठान, माळी सेवा मंडळ खामगांव यांच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे.