२५ दिवस उलटले; तूर, हरभरा अनुदान मिळेना; अकोला जिल्ह्यातील ५० हजारांवर शेतकऱ्यांना प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 02:41 PM2018-06-30T14:41:47+5:302018-06-30T14:44:45+5:30
तूर, हरभरा अनुदानाची रक्कम मिळणार तरी केव्हा, याबाबत जिल्ह्यातील ५० हजार ५९ शेतकऱ्यांकडून प्रतीक्षा केली जात आहे.
- संतोष येलकर
अकोला : आधारभूत किंमत योजनेंतर्गत तूर व हरभरा खरेदीसाठी ‘आॅनलाइन’ नोंदणी केलेल्या; मात्र तूर व हरभरा खरेदी बाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी गत ५ जून रोजी शासनामार्फत प्रतिक्विंटल एक हजार रुपयेप्रमाणे अनुदान जाहीर करण्यात आले आहे. अनुदान जाहीर झाल्यानंतर २५ दिवसांचा कालावधी उलटला; खरीप पेरण्यांची लगबग सुरू झाली असली, तरी अद्यापही तूर व हरभरा उत्पादक शेतकऱ्यांच्या पदारात अनुदानाची रक्कम पडली नाही. त्यामुळे तूर, हरभरा अनुदानाची रक्कम मिळणार तरी केव्हा, याबाबत जिल्ह्यातील ५० हजार ५९ शेतकऱ्यांकडून प्रतीक्षा केली जात आहे.
किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत तूर व हरभरा खरेदीसाठी ‘एनईएमएल’ पोर्टलवर आॅनलाइन नोंदणी केलेल्या; मात्र तूर व हरभरा खरेदी करण्यात आली नाही, अशा शेतकºयांना प्रतिक्विंटल एक हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय शासनामार्फत गत ५ जून रोजी घेण्यात आला. त्यानुसार अकोला जिल्ह्यात तूर व हरभरा खरेदीसाठी नोंदणी केलेल्या; मात्र तूर व हरभरा खरेदी करण्यात आली नाही, अशा जिल्ह्यातील ५० हजार ५९ शेतकऱ्यांना शासनाच्या प्रतिक्विंटल एक हजार रुपयेप्रमाणे अनुदानाचा लाभ मिळणार आहे; परंतु अनुदान जाहीर झाल्यानंतर २५ दिवसांचा कालावधी उलटून गेला असून, जिल्ह्यात खरीप पेरण्यांची लगबग सुरू झाली असताना, तूर व हरभरा अनुदानाचा लाभ मात्र अद्यापही शेतकºयांना मिळाला नाही. त्यानुषंगाने तूर व हरभºयाचे प्रतिक्विंटल एक हजार रुपयांचे अनुदान केव्हा मिळणार, याबाबत ५० हजार ५९ तूर व हरभरा उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रतीक्षा केली जात आहे.
पिकाचे क्षेत्र, उत्पादन पडताळणीचे काम सुरू!
शासन निर्णयातील निकषानुसार तूर व हरभरा खरेदीसाठी नोंदणी केलेल्या मात्र खरेदी करण्यात आली नाही, अशा शेतकºयांसाठी प्रतिक्विंटल एक हजार रुपये अनुदान जाहीर करण्यात आले. दोन हेक्टर मर्यादेत २० क्विंटलपर्यंत तूर व हरभºयाचे अनुदान शेतकºयांना देण्यात येणार आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील तूर व हरभरा खरेदीसाठी नोंदणी केलेल्या मात्र खरेदी करण्यात आली नाही, अशा शेतकºयांचे तूर व हरभरा पिकाचे क्षेत्र, पिकाचे उत्पादन आणि शेतकºयांनी बाजारात विकलेली तूर व हरभरा यासंदर्भात माहिती पडताळणीचे काम जिल्ह्यातील तहसील कार्यालयामार्फत सुरू आहे.
शासन निर्णयातील निकषानुसार तूर व हरभरा खरेदीसाठी नोंदणी केलेले; मात्र खरेदी करण्यात आली नाही, असे शेतकरी, पिकाचे क्षेत्र, उत्पादन व बाजारात विकलेला माल यासंदर्भात माहितीची पडताळणी करण्याचे काम जिल्ह्यातील तहसील कार्यालयामार्फत सुरू आहे. अनुदानाची रक्कम प्राप्त झाल्यानंतर शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.
- राजेश तराळे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी.