- संतोष येलकरअकोला : आधारभूत किंमत योजनेंतर्गत तूर व हरभरा खरेदीसाठी ‘आॅनलाइन’ नोंदणी केलेल्या; मात्र तूर व हरभरा खरेदी बाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी गत ५ जून रोजी शासनामार्फत प्रतिक्विंटल एक हजार रुपयेप्रमाणे अनुदान जाहीर करण्यात आले आहे. अनुदान जाहीर झाल्यानंतर २५ दिवसांचा कालावधी उलटला; खरीप पेरण्यांची लगबग सुरू झाली असली, तरी अद्यापही तूर व हरभरा उत्पादक शेतकऱ्यांच्या पदारात अनुदानाची रक्कम पडली नाही. त्यामुळे तूर, हरभरा अनुदानाची रक्कम मिळणार तरी केव्हा, याबाबत जिल्ह्यातील ५० हजार ५९ शेतकऱ्यांकडून प्रतीक्षा केली जात आहे.किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत तूर व हरभरा खरेदीसाठी ‘एनईएमएल’ पोर्टलवर आॅनलाइन नोंदणी केलेल्या; मात्र तूर व हरभरा खरेदी करण्यात आली नाही, अशा शेतकºयांना प्रतिक्विंटल एक हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय शासनामार्फत गत ५ जून रोजी घेण्यात आला. त्यानुसार अकोला जिल्ह्यात तूर व हरभरा खरेदीसाठी नोंदणी केलेल्या; मात्र तूर व हरभरा खरेदी करण्यात आली नाही, अशा जिल्ह्यातील ५० हजार ५९ शेतकऱ्यांना शासनाच्या प्रतिक्विंटल एक हजार रुपयेप्रमाणे अनुदानाचा लाभ मिळणार आहे; परंतु अनुदान जाहीर झाल्यानंतर २५ दिवसांचा कालावधी उलटून गेला असून, जिल्ह्यात खरीप पेरण्यांची लगबग सुरू झाली असताना, तूर व हरभरा अनुदानाचा लाभ मात्र अद्यापही शेतकºयांना मिळाला नाही. त्यानुषंगाने तूर व हरभºयाचे प्रतिक्विंटल एक हजार रुपयांचे अनुदान केव्हा मिळणार, याबाबत ५० हजार ५९ तूर व हरभरा उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रतीक्षा केली जात आहे.पिकाचे क्षेत्र, उत्पादन पडताळणीचे काम सुरू!शासन निर्णयातील निकषानुसार तूर व हरभरा खरेदीसाठी नोंदणी केलेल्या मात्र खरेदी करण्यात आली नाही, अशा शेतकºयांसाठी प्रतिक्विंटल एक हजार रुपये अनुदान जाहीर करण्यात आले. दोन हेक्टर मर्यादेत २० क्विंटलपर्यंत तूर व हरभºयाचे अनुदान शेतकºयांना देण्यात येणार आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील तूर व हरभरा खरेदीसाठी नोंदणी केलेल्या मात्र खरेदी करण्यात आली नाही, अशा शेतकºयांचे तूर व हरभरा पिकाचे क्षेत्र, पिकाचे उत्पादन आणि शेतकºयांनी बाजारात विकलेली तूर व हरभरा यासंदर्भात माहिती पडताळणीचे काम जिल्ह्यातील तहसील कार्यालयामार्फत सुरू आहे.
शासन निर्णयातील निकषानुसार तूर व हरभरा खरेदीसाठी नोंदणी केलेले; मात्र खरेदी करण्यात आली नाही, असे शेतकरी, पिकाचे क्षेत्र, उत्पादन व बाजारात विकलेला माल यासंदर्भात माहितीची पडताळणी करण्याचे काम जिल्ह्यातील तहसील कार्यालयामार्फत सुरू आहे. अनुदानाची रक्कम प्राप्त झाल्यानंतर शेतकºयांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.- राजेश तराळे, जिल्हा मार्केटिंग अधिकारी.