उड्डाणपूलावर काम करणारे २५० मजूर अडकले अकोल्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 05:17 PM2020-04-03T17:17:25+5:302020-04-03T17:17:31+5:30

उ्ड्डाणपूलाच्या बांधकामासाठी आलेले २५० मजूर कोरोना संसर्गाच्या लॉकडाऊनमुळे अकोल्यात अडकले आहेत.

250 labours working at the flyover stuck in Akola | उड्डाणपूलावर काम करणारे २५० मजूर अडकले अकोल्यात

उड्डाणपूलावर काम करणारे २५० मजूर अडकले अकोल्यात

Next

अकोला : अकोल्यातील उ्ड्डाणपूलाच्या बांधकामासाठी आलेले २५० मजूर कोरोना संसर्गाच्या लॉकडाऊनमुळे अकोल्यात अडकले आहेत. आता या मजूरांच्या उदरनिवार्हाची जबाबदारी कंत्राटदरावर आली आहे. त्यामुळे खडकी येथील कंत्राटदाराच्या प्लॅन्टवर दररोज या मजूरांसाठी भोजन तयार केले जात आहे.
गत वर्षभरापासून जिल्हा मध्यवर्ती कारागृहाप्च्या प्रवेशद्वारापासून तरएसीसीच्या प्रवेशद्वारापर्यंत उड्डाणपूलाचे बांधकाम युध्दस्तरावर सुरूआहे. कंपनीच्या कंत्राटदारांना या कामासाठी बंगाल येथील २५० मजूर अकोल्यात आणले आहेत. त्यांच्या माध्यमातून मेहनतीचे काम करवून घेतले जातआहे. हे बांधकाम सुरू असताना कोरोना संसर्गचा लॉकडाऊन केला गेला.त्यामुळे बंगाल येथील २५० मजूर अकोल्यात अडकले आहे. या २५० मजूरांंच्याउदर निवार्हाची जबाबदारी कंत्राटदारावर आली आहे. उड्डाणपूलाच्या साईटवरअसलेल्या विविध ठिकाणी आता कंत्राटदाराची माणसे त्यांच्या जेवणाची सुविधा पुरवित आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना परत जाण्यासाठी मागीतली परवानगी
२५० मजूरांच्या जेवणाचा खर्च सोसत असलेल्या कंत्राटदाराने जिल्हाधिकारीजितेंद्र पापळकर यांच्याकडे बांधकाम करण्याची किंवा मजूरांना त्यांच्यागावी पाठविण्याची परवानगी मागितली आहे. एकतर रात्रीच्या वेळी उड्डाणपूलाचे बांधकाम करू द्यावे. अन्यथा या मजूरांना त्यांच्या गावीपाठविण्याची परवानगी द्यावी. अशा आशयाचे पत्र कंत्राटदाराने जिल्हाधिकारीयांना दिले आहे. त्यावर अद्याप प्रशासनाने निर्णय घेतलेला नाही.

 

Web Title: 250 labours working at the flyover stuck in Akola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.